Petrol Pump Worker Struggle: दिवसभर उभे राहून सेवा, तरीही जगण्यासाठी धडपड

कुटुंबासाठी पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची कहाणी
Petrol Pump Worker Struggle
Petrol Pump Worker StrugglePudhari
Published on
Updated on

पुणे: गेली दहा वर्षे पेट्रोल पंपावर काम करतोय. पण, अजूनही संसाराचा गाडा रुळावर आलेला नाही. महिन्याला बारा हजार रुपये पगार मिळतो. घरभाडं, मुलाचं शिक्षण, घरखर्च... यात काहीच भागत नाही.

अनेकदा उसनवारी करून महिना काढावा लागतो. पाय दुखतात, शरीर थकून जातं; पण थांबून चालत नाही. कारण, माझ्या कुटुंबाच्या भाकरीची जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे, असे पेट्रोल पंपावर काम करणारे दीपक गायकवाड (नाव बदलले आहे) सांगत होते. हे सांगताना त्यांच्या डोळ्यांत जगण्याचा संघर्ष स्पष्ट दिसत होता.

Petrol Pump Worker Struggle
Pune Stray Dog Sterilization: पुण्यात भटक्या श्वानांचा सुळसुळाट! नसबंदीचा भार केवळ दोन संस्थांवर

आपण वाहनात पेट्रोल भरतो आणि काही क्षणांत पुढच्या प्रवासाला निघून जातो. मात्र, त्या काही मिनिटांच्या सेवेमागे अनेक न बोललेल्या वेदना, अपुरी स्वप्नं आणि संघर्षाची कहाणी दडलेली असते. उन्हाचा तडाखा असो, मुसळधार पाऊस असो किंवा थंडीची रात्र... पेट्रोल पंपावरील कर्मचारी मात्र आपल्या जागेवर खंबीरपणे उभे असतात.

सकाळी लवकर सुरू होणारा त्यांचा दिवस अनेकदा रात्री उशिरा संपतो. दिवसभर वाहनांच्या धुरात, पेट्रोल-डिझेलच्या वासात आणि सततच्या धावपळीत त्यांना आयुष्य घालवावे लागते. अनेकांना श्वसनाचे, पायदुखीचे आणि इतर आरोग्याचे त्रास होतात.

तरीही लोकांसमोर हसतमुख राहण्याचा प्रयत्न ते करीत असतात. पेट्रोल भरताना नियमांचे पालन, आग किंवा दुर्घटना टाळण्यासाठी सतर्कता आणि लोकांना मार्गदर्शन, अशी अनेक कामे ते पार पाडतात. तरीही त्यांच्या कष्टाची फारशी दखल घेतली जात नसल्याची खंत कर्मचारी व्यक्त करतात.

पेट्रोल पंपावर काम करणारे अनिल घालमे यांची कहाणीही वेगळी नाही. नगर जिल्ह्यात त्यांचे कुटुंब राहते. पत्नी, दोन मुले, आई-वडील यांचा संपूर्ण खर्च त्यांच्या कमाईवर अवलंबून आहे. महिन्याला 12 हजार रुपये पगार मिळतो. त्यामुळे 12 तासांऐवजी 16 तास काम करतो, असे घालमे म्हणाले.

Petrol Pump Worker Struggle
Pune Dowry Cases: पुण्यात पैशांसाठी महिलांचा छळ, दोघींनी संपवले आयुष्य; चंदननगर, वाघोलीतील घटना

आमचीही काही स्वप्नं आहेत

दिवसभर इतरांच्या वाहनात इंधन भरताना अनेक पेट्रोल पंप कर्मचारी स्वतःच्या आयुष्याला मात्र इंधन देण्यासाठी धडपड करीत आहेत. कोणाला मुलाला चांगल्या शाळेत शिकवायचे आहे, कोणाला स्वतःचे छोटेसे घर बांधायचे आहे. मात्र, अपुरा पगार, वाढती महागाई आणि नोकरीची असुरक्षितता, यामुळे त्यांची ही स्वप्नं अपुरीच आहेत.

कामाचे तास : 12 ते 16 तास प्रतिदिन

मासिक वेतन : 12 ते 20 हजार रुपये

अतिरिक्त कामाचा मोबदला : फक्त 700 ते 800 रुपये

बहुतांश कर्मचारी : ग््राामीण भागातून रोजगारासाठी पुण्यात दाखल

सर्वांत मोठी चिंता : वाढती महागाई आणि कुटुंबाचा खर्

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news