Pune Stray Dog Sterilization: पुण्यात भटक्या श्वानांचा सुळसुळाट! नसबंदीचा भार केवळ दोन संस्थांवर

संख्या 3 लाखांच्या पुढे, नागरिक धास्तावले
Stray Dog
Stray DogPudhari
Published on
Updated on

निनाद देशमुख

पुणे: शहर आणि नवनवीन समाविष्ट गावांमध्ये भटक्या श्वानांचा उपद्रव वाढला असून, त्यांची संख्या आता तीन लाखांच्या घरात पोहोचली आहे. या श्वानांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने पाच वर्षांपासून तीन संस्थांची नियुक्ती केली आहे.

यातील एका संस्थेने काम सोडले असून, आता भटक्या श्वानांच्या नसबंदीची जबाबदारी ही दोन संस्थांवरच आली आहे. श्वानांच्या अवाढव्य संख्येसमोर पालिकेची यंत्रणा अत्यंत तोकडी पडत असून, नसबंदी व लसीकरण कागदावरच अधिक रंगत असल्याचे चित्र आहे. पालिकेच्या या उदासीनतेमुळे पुणेकरांच्या, विशेषतः लहान मुले आणि वृद्धांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Stray Dog
Pune Dowry Cases: पुण्यात पैशांसाठी महिलांचा छळ, दोघींनी संपवले आयुष्य; चंदननगर, वाघोलीतील घटना

श्वानांची वाढती संख्या आणि शहराचा झपाट्याने होणारा विस्तार पाहता नसबंदी, लसीकरणाची गती वाढवण्याचे आव्हान संस्थांपुढे निर्माण झाले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे युनिव्हर्सल ॲनिमल वेल्फेअर सोसायटी, कॅनाईन अँड केअर आणि ब्लू क्रॉस या तीन संस्थांमार्फत नसबंदी आणि लसीकरण केले जाते.

यातील ‌‘युनिव्हर्सल‌’ या संस्थेला पालिकेकडून प्रतिश्वान 1650 रुपये मोजले जातात, तर उरलेल्या दोन संस्थांना पालिकेने मोफत जागा दिल्या आहेत. मात्र, मोफत जागा देऊनही ‌‘कॅनाईन‌’ आणि ‌‘ब्लू क्रॉस‌’ या संस्थांचा कारभार प्रचंड संथ आहे. या दोन्ही संस्थांचा वर्षभराचा अधिकृत लेखाजोखा पालिकेकडे उपलब्ध नसावा, यावरूनच पालिकेच्या गांभीर्याची पोलखोल होते.

Stray Dog
Mahavitaran Bribery Case: वीजमीटरसाठी लाच मागणे भोवले; अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला सात हजारांची लाच घेताना अटक

वाहने अपुरी; तक्रारी करूनही गाडी फिरकेना!

तीन लाख श्वानांचा ताफा नियंत्रित करण्यासाठी संपूर्ण पुणे शहरात केवळ 23 वाहने कार्यरत आहेत, ज्यामध्ये पालिकेची अवघी 5 आणि खासगी संस्थांची 18 वाहने आहेत. परिणामी, एखाद्या भागात श्वानांचा उपद्रव वाढल्यास नागरिकांनी तक्रार करूनही पालिकेची गाडी कित्येक दिवस फिरकत नाही आणि गाडी आली तरी कर्मचारी श्वान न पकडताच निघून जातात, अशा तक्रारी नागरिक करत आहेत.

8 ते 10 संस्थांना काम दिल्यास नसबंदीची उद्दिष्टपूर्ती शक्य

भटक्या श्वानांना खाऊ घालण्यासाठी महापालिकेने 94 फीडर पॉइंट तयार केले आहेत. पुण्यात सध्या केवळ दोन संस्थांमार्फत भटक्या श्वानांची नसबंदी केली जाते. त्यामुळे ही प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. जर महापालिकेने हे काम 8 ते 10 संस्थांना दिले तर नसबंदीचे उद्दिष्ट एकाच वर्षात गाठणे शक्य आहे. मात्र, हे काम करण्यास संस्था पुढे येत नसल्याने महापालिकेसमोर पेच पडला आहे.

संस्थांच्या कामाचा लेखाजोखा आणि सद्य:स्थिती:

  • युनिव्हर्सल ॲनिमल वेल्फेअर सोसायटी (एप्रिल 2025 ते फेबुवारी 2026 मधील कामगिरी)

  • नसबंदी शस्त्रक्रिया (एकूण) : 54,463 श्वान

  • लसीकरण (एकूण) : 1,56,902 श्वान

  • जंतुनिर्मूलन : 54,463 कुत्री

  • दैनिक नसबंदी क्षमता : 294 श्वान प्रतिदिवस

  • सेवक वर्ग व वाहने : 124 कर्मचारी आणि 10 गाड्या

  • केंद्रे : होळकरवाडी, वडकी व कात्रज (खासगी) आणि मुंढवा-केशवनगर (मोफत काम).

कॅनाईन कंट्रोल अँड केअर आणि ब्लू क्रॉस यांची एकत्रित स्थिती

  • दैनिक नसबंदी क्षमता : केवळ 50 श्वान प्रतिदिवस

  • सेवक वर्ग व वाहने : 10 कर्मचारी आणि केवळ 3 गाड्या (अत्यंत अपुरे मनुष्यबळ!)

  • केंद्रे (जागा पालिकेने 5 ते 30 वर्षांच्या करारावर मोफत दिली आहे) : बाणेर, मोहननगर, नायडू हॉस्पिटल आणि मुंढवा-केशवनगर.

महापालिकेमार्फत सीएसआर फंडातून आणखी काही संस्थांना कामे देण्याचे नियोजन आहे. सध्या आचारसंहिता आहे. आचारसंहिता संपताच याबाबत निर्णय घेऊन कामे दिले जातील. सध्या दोन संस्थांमार्फत नसबंदीचे काम सुरू आहे. मात्र, लवकरच संस्थांची संख्या वाढवली जाईल.

-सारिका फुंदे-भोसले, पशुसंवर्धन अधिकारी, महापालिका

logo
Pudhari News
pudhari.news