PDCC Bank Bonds: पीडीसीसी बँकेला RBIची 650 कोटींच्या बॉण्ड उभारणीस मंजुरी; गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी

रिझर्व्ह बँकेच्या मंजुरीनंतर पीडीसीसी बँकेने PDI आणि LTSB बॉण्ड योजना सुरू केली; 10 हजार रुपयांपासून गुंतवणूक, 8.50 टक्के व्याजदरासह गुंतवणूकदारांना आकर्षक पर्याय
RBI
RBI file photo
Published on
Updated on

पुणे: भारतीय रिझर्व्ह बँकेने पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेंस (पीडीसीसी) 650 कोटी रुपयांच्या बॉण्डस्‌ उभारणीस दिलेली परवानगी ही जिल्हा बँकेंच्या इतिहासातील महत्वाचा क्षण आहे. यातून बँकेंच्या दीर्घकालीन विकासाचा पाया रचण्यास सुरुवात झाली असून आजवर बँकेंने मिळविलेली आर्थिक विश्वासार्हता, सातत्यपूर्ण प्रगत व उंचावलेला आर्थिक स्तर आणि सक्षम व्यवस्थापनाची पावती असल्याचे गौरवोद्वगार राज्य सहकारी बँकेंचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी काढले.

RBI
Kurkumbh MIDC Chemical Industry: कुरकुंभ एमआयडीसीत बोगस केमिकलचा खेळ? रासायनिक उद्योगांवर वाढले संशयाचे सावट

पीडीसीसी बँकेंच्या ''पर्पेच्युअल डेट इन्स्टुमेंट (पीडीआय) आणि लाँग टर्म सबऑर्डिनेटेड बाँड्स (एलटीएसबी) योजनेचा शुभारंभ अनास्कर यांच्या हस्ते जिल्हा बँकेंच्या मुख्यालयातील स्व.यशवंतराव चव्हाण सभागृहात बुधवारी (दि.22) दुपारी पार पडला. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा.डॉ. दिगंबर दुर्गाडे हे होते. जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप (पुणे ग्रामीण) यांच्यासह यावेळी व्यासपीठावर बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, संचालक प्रवीण शिंदे, अशोक पवार, संजय काळे, विकास दांगट, भालचंद्र जगताप, निर्मला जागडे, पूजा बुट्टे पाटील,प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय शितोळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

RBI
Shirur Leopard Attack: शिरूरमध्ये बिबट्याचा पुन्हा हल्ला; ५ वर्षीय मुलीचा मृत्यू, वन विभागाचे १३ पिंजरे, नागरिकांचा संताप

पीडीसीसी बँकेच्या प्रगतीमध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अत्यंत मोलाचे योगदान राहिले असून, त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळेच बँकेने आजची भक्कम आर्थिक वाटचाल साध्य केल्याचे नमूद करुन अनास्कर म्हणाले, आम्ही धोरणकर्ते म्हणून काम करीत असलो तरी बँकेंच्या प्रगतीचे श्रेय हे अधिकारी-कर्मचाऱ्यांना जाते. ग्राहक हा केंद्रबिंदू मानून त्यांच्या समाधानाला सर्वोच्च प्राधान्य देत प्रशिक्षित, अनुभवी आणि समर्पित भावनेने बँकेंसाठी काम करणारे कर्मचारी हीच कोणत्याही बँकेची खरी संपत्ती असल्याचे ते म्हणाले.

RBI
Ajitdada Pawar Krishi Samruddhi Karj Yojana: PDCC ची 'अजितदादा पवार कृषी समृद्धी कर्ज योजना' सुरू; AI आधारित कर्ज योजनेचा 24 जुलैला शुभारंभ

विद्याधर अनास्कर यांनी स्वतः जिल्हा बँकेंच्या योजनेमध्ये दोन लाखांची गुंतवणूक केली. बँकेंचे संचालक अशोक पवार, संजय काळे यांच्यासह प्रा. दिगंबर दुर्गाडे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे स्वागत बँकेंचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, प्रास्तविक संजय शितोळे,उपमहाव्यवस्थापक डॉ. डी.आर. कदम यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

RBI
Narayanpur Guru Purnima: श्रीक्षेत्र नारायणपूरात 29 जुलैला भव्य सोहळा; लाखो भाविकांच्या आगमनासाठी प्रशासन सज्ज

जिल्हा बँकेंच्या एका बॉण्डची किंमत 10 हजार रुपये

जिल्हा बँकेंच्या एलटीएसबी बॉण्ड योजनेत 10 हजार रुपयांचा एक बॉण्ड असून त्याच्या पटीत गुंतवणूक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यावरील व्याजाची रक्कम दरमहा गुंतवणूकदारांच्या खात्यात जमा होणार आहे. या बॉण्डची मुदत १० वर्षांची आहे. तसेच पीडीआय या बॉण्ड योजनेअंतर्गतही किमान १० हजार रुपये किंवा त्याच्या पटीत गुंतवणूक करता येणार आहे. बॉण्डवर 8.50 टक्‍के व्याजदर असून व्याजाची रक्कम प्रत्येक तीन महिन्यांनी गुंतवणूकदारांच्या खात्यात जमा होणार असून, या बॉण्डची मुदत कायमस्वरूपी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news