Pune Dowry Harassment Case: दिवाळीत सोन्याच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ? पायल पवार-झांबरेच्या मृत्यूने खळबळ; पती अटकेत, सासरचे तिघे फरार

दरवर्षी पाच ते दहा तोळे सोन्याची मागणी केल्याचा माहेरच्यांचा आरोप; मुलीच्या हिश्श्याची जमीन नावावर करण्यासाठीही तगादा, कुटुंबीयांकडून घातपाताचा संशय
Zambre Family
Zambre FamilyPudhari
Published on: 
Updated on: 

खेड शिवापूर: सात वर्षांपूर्वी विवाह झालेल्या पायल पवार-झांबरे या विवाहितेला माहेरहून पैसे व सोने घेऊन ये, तसेच तुझ्या हिश्श्याची जमीन माझ्या मुलाच्या नावे कर, यासाठी सासरच्या मंडळींकडून (सासू) शारीरिक, तसेच मानसिक छळ होत होता. त्यामुळे सोमवारी (दि. २) तिने टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या केली; मात्र, माहेरकडील कुटुंबांने तिची सासरच्या मंडळींनी हत्याच केली, असा आरोप माध्यमांशी बोलताना केला. यामुळे वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकाराच्या घटनेची आठवण पुन्हा एकदा ताजी झाली.

Zambre Family
Pune FDA Action On Sweets: दिवाळीच्या मिठाईवर एफडीएचा छापा; पुण्यात १,४९१ किलो मिठाईचा साठा नष्ट!

खेड-शिवापूर परिसरातील श्रीरामनगर (ता. हवेली) येथील शेतकरी व व्यावसायिक रवींद्र कृष्णा पवार यांची मुलगी, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांची पुतणी पायल पवार हिचा विवाह सात वर्षांपूर्वी मुकुंदनगर, पुणे येथील अक्षय बाळासाहेब झांबरे यांच्याशी झाला होता. लग्नामध्ये मोठ्या प्रमाणात हुंडा देण्यात आला होता. त्याचीच पुनरावृत्ती दरवर्षी दिवाळीमध्ये होत होती. दर दिवाळीला पाच ते दहा तोळ्यांची मागणी होत होती. मुलीला सुख मिळावे, तिला त्रास होऊ नये यासाठी ते ही मागणी देखील पूर्ण करीत असत.

Zambre Family
Malthan Armed Robbery: मलठणमध्ये सशस्त्र दरोडा; वृद्ध दाम्पत्याला लोखंडी रॉडने मारहाण, सोन्याचे दागिने लुटले

दरवर्षीप्रमाणे या वर्षीही दहा तोळ्यांची मागणी केली होती, तसेच मुलीच्या हिश्श्याची जमीन नावावर करा, अशी मागणी केली जात होती. परंतु यावर्षी दुष्काळी परिस्थिती आहे, आम्ही शेतकरी कुटुंबातील आहोत, त्यामुळे यावेळी एवढे तोळे द्यायला जमणार नाही. पुढील दिवाळीत यापेक्षा जास्त देऊ, असे पवार कुटुंबाने सांगितले होते; मात्र, हे कदाचित त्यांना मान्य नव्हते. त्यामुळेच पायल हिला जास्त मानसिक व शारीरिक त्रास दिला जाऊ लागला आणि त्या त्रासाने शेवटी पायलचा जीव घेतला. याप्रकरणी पती अक्षय झांबरे याला स्वारगेट पोलिसांनी अटक केली असून, इतर सासू मंगल झांबरे, सासरे बाळासाहेब झांबरे आणि नणंद अक्षता झांबरे-निम्हण असे तीन जण फरार आहेत.

Zambre Family
Ajit Pawar Biopic Film: अजितदादांच्या जीवनावर जगाला हेवा वाटेल असा चित्रपट बनवणार; प्रवीण तरडेंचा निर्धार

पायलच्या वडिलांनी फोडला हंबरडा

संबंधित प्रशासनाने, मुलींना समान हक्क कायदा काढला आणि त्यामुळे आमचे होत्याचे नव्हते झाले. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी चांदीची झालर तुम्ही दिली नाही, असा फोन आल्यावर आम्हाला त्रास झाला होता. सोने, चांदी आणि पैशांबरोबरच मुलीला तिचा हिस्सा घेण्यासाठी सासूकडून तगादा लावला जात होता. आज त्याच मालमत्तेच्या हव्यासामुळे आमचा काळजाचा तुकडा सासरच्यांनी गिळला, असे सांगताना पायलचे वडील रवींद्र पवार यांनी अक्षरशः हंबरडा फोडला.

Zambre Family
Pimpri Nigdi Metro: पिंपरी ते निगडी मेट्रो जून २०२७ पर्यंत धावणार; दुसऱ्या टप्प्यातील कामाला वेग

प्रत्येक दिवाळीला त्यांच्या मागणीनुसार आम्ही पाच ते दहा तोळे सोने देत होतो. यावेळीही त्यांनी पाच तोळ्यांची मागणी केली होती. आम्ही यावेळी परिस्थिती नाही पुढच्या वेळी वाढवून देऊ असे सांगितले. पण तेवढ्यासाठी आमच्या मुलीला जिवे मारतील असे स्वप्नातही वाटले नव्हते. मुलाला अटक झाली असली तरी खरी सूत्रधार सासू फरार आहे, तसेच तिचे सासरे व नणंद फरार आहेत त्यांना आश्रय देणाऱ्या व्यक्तींनाही सहआरोपी करावे.

राजेंद्र पवार, मुलीचे चुलते तसेच अध्यक्ष, खडकवासला विधानसभा मतदारसंघ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

मी स्वतः बहिणीला घटनेच्या आदल्या दिवशी कॅब करून तिच्या माहेरी पाठवले होते. त्यानंतर रात्री मला बहिणीचा मेसेज आला होता. माझे काही बरे-वाईट झाले तर त्याला सर्वस्वी सासू जबाबदार असेल. हा मेसेज वाचल्यानंतर मी तत्काळ तिला कॉल केला; मात्र, तो बंद लागला. त्यानंतर दाजी अक्षय यांना संपर्क केला, तर ते म्हणाले, आम्ही आमचे बघून घेऊ आणि रात्री ११ वाजता सासऱ्यांना संपर्क केला, तर त्याचा फोन बंद लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला फोन आला की, पायल घरातून निघून गेली आहे. त्यामुळे आम्ही अर्ध्या-पाऊण तासात पुणे येथे गेलो, तर आम्हालाच विचारणा करण्यात आली. शोधाशोध सुरू असताना पुन्हा त्यांनीच आम्हाला सांगितले की, इकडे फ्लॅटमध्ये आहे. मी स्वतः दरवाजा उडघण्याचा प्रयत्न केला; मात्र, तो बंद असल्याने मागून जाऊन खिडकी फोडून आत गेलो असता मला बहिणीने गळफास घेतला असल्याचे दिसून आले. या सर्व घडामोडी पाहता तिचा घातपात झाला असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आम्हाला न्याय द्या.

ऋषीकेश पवार,पायलचा भाऊ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.