Wild Animal Attack Pune | वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ऊसतोड मजुराच्या ५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू ; फडात आढळला रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह

Bhor News | केंजळ (ता. भोर) येथील घटनेने खळबळ
Sugarcane Worker  child death by wild animal
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेला कृष्णा किरण सोनवणे (इनसेटमध्ये) आणि शोकाकुल ऊसमजूरPudhari
Published on
Updated on

Sugarcane Worker child death by wild animal

नसरापूर: ऊसतोड मजुराच्या पाच वर्षाचा मुलाचा अज्ञात वन्य प्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ही घटना केंजळ ( ता. भोर ) येथे आज (दि.७) सकाळी नऊ च्या सुमारास घडली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. मात्र, राजगड पोलिस ठाण्यात अद्याप या घटनेबाबत नोंद करण्यात आलेली नाही. हा हल्ला बिबट्याने केला की इतर वन्यप्राणी केला, याचा वनविभागाला तपास करावा लागणार आहे.

कृष्णा किरण सोनवणे (वय ५, रा. चाळीसगाव) असे वन्य प्राण्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. येथील एका शेतकऱ्याच्या उसाच्या शेतात अत्यवस्थ जखमी अवस्थेत मुलगा आढळला. उपचारासाठी त्याला भोर जिल्हा उपरुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. मृत्यूचे कारण समजू शकले नाही.

Sugarcane Worker  child death by wild animal
Pune News : विमाननगरच्या पबमध्ये गुन्हेगारांची थाटात डीजे पार्टी?

अधिक माहिती अशी की, फलटण तालुक्यातील साखरवाडी कारखान्याचे ऊसतोड मजुराच्या केंजळ गावात कोप्या असून शेजारील शेतात ऊस तोडत असताना कृष्णा याला शौचालयाला आल्याने त्याची आई सरलाबाई हिने त्याला शेजारील शेताच्या बाजूला बसविले. काही वेळाने कृष्णा हा दिसेनासे झाल्याने ऊस मजुरांनी शोधाशोध केली असता कृष्णा हा रक्तबंबाळ अवस्थेत दिसला. यानंतर उपचारासाठी भोर रुग्णालयात नेले असता त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. वनविभाग याबाबत अधिक तपास करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news