Passport Rules: मोठी बातमी! पासपोर्टसाठी AI चा वापर करुन चुकीची माहिती दिल्यास गुन्हा दाखल होणार

विभागीय पारपत्र अधिकारी डॉ.विनोद गायकवाड यांची माहिती
Providing Incorrect Information will led to Criminal Charges
Providing Incorrect Information will led to Criminal ChargesPudhari
Published on
Updated on

Passport New Rule Fake Documents

पुणेः विदेशात जाण्यासाठी काहीजण खरी माहिती लपवून 'एआय' चा वापर करुन खोटी कागदपत्रे पारपत्र (पासपोर्ट) कार्यालयाला देत आहेत.त्यामुळे यापुढे खोटी माहिती देऊन पासपोर्ट काढण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर आता फौजदारी गुन्हे दाखल होतील.अशी माहिती विभागीय पारपत्र अधिकारी डॉ.विनोद गायकवाड यांनी दिली.

Providing Incorrect Information will led to Criminal Charges
Pune Pimpri Passport Applications: पुणे विभागात पासपोर्ट अर्जांचा विक्रमी वाढ; पाच लाखांहून अधिक अर्ज प्राप्त

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने विभागीय पारपत्र अधिकारी डॉ.विनोद गायकवाड यांच्या वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी उपविभागीय पारपत्र अधिकारी श्रृती पांडे,पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील,सरचिटणीस मंगेश फल्ले,पारपत्र कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी जतीन पोटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Providing Incorrect Information will led to Criminal Charges
E-passport India | भारताचा ई-पासपोर्ट लॉन्च! आता तुमचा प्रवास होणार अधिक जलद आणि सुरक्षित

काय म्हणाले,डॉ.गायकवाड...

  • आता पारपत्र कार्यालयाचे कामकाज पूर्णपणे डिजिटल झाले आहे.त्यामुळे ते सर्व ऑलनाईन होते.अपाँन्टमेट पासून पासपोर्ट मिळेपर्यंत सर्वकाही वेगाने होत आहे.

  • फक्त सरकारने सांगितलेली कागदपत्रे गोळा करुन मग अर्ज भरला तर काम सहज,सोपे अन वेगाने होते.

Providing Incorrect Information will led to Criminal Charges
India Global Passport Ranking: जागितक पासपोर्ट रँकिंगमध्ये भारताची स्थिती झाली मजबूत; तब्बल ५५ देशांमध्ये व्हिसा फ्री प्रवेश
  • पुण्यात दरमहा सुमारे ४ हजार अर्ज येतात.बाणेर कार्यलयातून १२ जिल्ह्यांचे काम चालते.एकुण १९ ऑफीस आहेत.१७ पोस्टऑफीसच्या माध्यमातूनही काम चालते.

  • एजंटकडे जाण्याची गरज नाही.ऑनलाईन अर्ज करा.

  • मेल पाठवला तर त्यावर किमान बारा तासांत उत्तर दिले जाते.इतके पारदर्शक काम आता होत आहे.

  • अर्जदार नेमके उलटे करतात.आधी अर्ज करुन मग कागदपत्रांसाठी धावाधाव करतात.म्हणून पासपोर्ट मिळण्यात अडचणी निर्माण होतात.

  • खरे तर ३० दिवसांत पासपोर्ट घरपोच देण्याचे आमचे लक्ष आहे.काही जणांना तसा अनुभव आहे.मात्र बहुतांश अर्जदार कागपत्रे नीट देत नाहीत.त्यामुळे वेळ लागतो.

Providing Incorrect Information will led to Criminal Charges
Pune Passport Van Book Festival: पुणे बुक फेस्टिव्हलमध्ये उद्यापासून मोबाइल पासपोर्ट शिबिर!

मराठी माध्यमात शिकलेले अधिकारी...

डॉ.गायकवाड यांचे मुळ गाव परभणी.शालेय शिक्षण बीड येथे मराठी माध्यमात झाले.तर उच्च शिक्षण पुण्यात झाले. आयुर्वेदात त्यांनी डॉक्टर पदवी घेतली.ते भारतीय परराष्ट्र सेवेच्या २०१३ च्या तुकडीचे अधिकारी आहेत.मराठी,हिंदी,इंग्रजीसह फ्रेंच भाषेवरही त्यांचे प्रभुत्व आहे.त्यांनी पुण्यात येण्यापूर्वी दिल्ली परराष्ट्र मंत्रालय, विदेशात त्यांनी फ्रान्स,रशिया आणि कुवेत येथील भारतीय दुतावासात देशाचे प्रतिनिधीत्व केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news