

India Global Passport Ranking: नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात जागतिक पासपोर्ट रँकिंगमध्ये भारताची स्थिती मजबूत झाली आहे. हेनली पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या नुकतेच रँकिंग जाहीर केली आहे. त्यात भारत ८० व्या स्थानावर पोहचला आहे. भारतने अल्जेरियासोबत संयुक्तरित्या ८० व्या क्रमांकावर स्थान मिळवलं आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत भारताची स्थिती मजबूत झाली आहे. यावरून भारताची जागतिक स्तरावर असलेली राजनैतिक पोहोच अन् आंतरराष्ट्रीय प्रवास सुविधांमधील प्रगती दिसून येते. भारतीय पासपोर्ट धारकांना ५५ देशांमध्ये व्हिसा फ्री एन्ट्री मिळते. हे देखील याचे एक उत्तम उदाहरण आहे.
भारताने गेल्या वर्षी हेनली पासपोर्ट इंडेक्समध्ये ८५ व्या क्रमांकावर स्थान मिळवलं होतं. यंदा यात ५ अंकांची सुधारणा झाली असून भारत ८० व्या स्थानावर पोहचला आहे. असं असलं तरी भारत अजूनही टॉप रँकिंगवाल्या देशांच्या तुलनेत खूपच मांग आहे. भारतीय पासपोर्ट धारकांना ५५ देशात व्हिसा फ्री एन्ट्री आहे. मात्र जगातील अनेक देशांमध्ये भारतीयांना व्हिसाशिवाय प्रवेश नाहीये.
पासपोर्ट रँकिंगमध्ये सर्वात टॉपवर सिंगापूरचा पासपोर्ट आहे. सिंगापूरचा पासपोर्ट असणाऱ्या लोकांना २२७ देशांमध्ये व्हिसा फ्री एन्ट्री आहे. या यादीत दुसऱ्या स्थानावर जपान आणि दक्षिण कोरिया संयुक्तरित्या विराजमान आहेत. या पासोर्ट धारकांना १८८ देशांमध्ये व्हिसा फ्री प्रवेश मिळतो.
तर डेन्मार्क, लग्जमबर्ग, स्पेन, स्विडन आणि स्वित्झर्लंड हे देश तिसऱ्या स्थानावर आहेत. या देशाच्या पासपोर्ट धारकांना १८६ देशात व्हिसा फ्री प्रवेश आहे. तर चौथ्या स्थानावर ऑस्ट्रिया, बेल्जियम, फिनलँड, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, आयर्लंड, नेदरलँड्स आणि नॉर्वे हे देश आहेत. या पासपोर्टवर १८५ देशात व्हिसा फ्री एन्ट्री आहे. हंगेरी, पोर्तुगाल, स्लोव्हाकिया, स्लोवेनिया आणि युएई हे देश पाचव्या स्थानावर आहेत.
भारताचा शेजारी देश पाकिस्तान हा ९८ व्या स्थानावर आहे. तर बांगलादेश हा ९५ व्या स्थानावर आहे. ही रँकिंग लंडनमध्ये असलेली हेनली अँड पार्टनर्स ही फर्म प्रसिद्ध करते. एखाद्या देशाच्या पासपोर्ट धारकांना किती देशात व्हिसा फ्री एन्ट्री मिळते याच्यावर ही रँकिंग ठरवली जाते.