Baramati News: बारामतीत धावत्या ST बसमध्येच कोयत्याने वार; उड्डाणपुलावर बस थांबताच रक्तबंबाळ तरुण पळत सुटला

Baramati Katewadi Todays News: ही घटना शुक्रवार (दि१ ) सकाळी सव्वा दहाच्या दरम्यान घडली
ST Bus Crime
चालत्या एसटी बस मध्येच कोयत्याने प्रवाशावर वार; काटेवाडी उड्डाण पुलावरील थरारक घटनाPudhari
Published on
Updated on

Baramati Indapur ST Bus Passenger Attack

काटेवाडी: बारामतीहून इंदापूर कडे निघालेल्या एसटी बस मध्ये काटेवाडीच्या उड्डाण पूला वरती एस.टी. बस मध्ये अज्ञात व्यक्तिने पवन गायकवाड या युवकावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले आहे. ही घटना शुक्रवार (दि१ ) सकाळी सव्वा दहाच्या दरम्यान घडली.

ST Bus Crime
Pune Crime: 'तुमच्याकडे खूप पैसा आहे,पन्नास लाख रुपये दे...अन्यथा तुला ठार मारेन

एस.टी.बस मध्ये ही झटापट चालू असताना एकच गोंधळ उडाला यावेळी एस.टी.बस वाहक तिकीट काढण्याचे काम करत होते. या गोंधळामुळे काटेवाडीच्या उड्डाण पूलावर एस.टी. बस थांबवण्यात आली. कोयत्याने वार झाल्याने पवन गायकवाड रक्तबंबाळ झाले होते त्याही अवस्थेत गाडी थांबलेने गायकवाड जिवाच्या आंकातने एस टी बसमधून पळत सुटले एस.टी. बस थांबल्याने पुलावर एकच गोंधळ उडाला.  (Latest Pune News)

त्या गोंधळात कोयता धारक अज्ञात युवक त्याच्या विरुद्ध दिशेने पळून गेला गावातील युवक व काही प्रवाशांनी सिनेस्टॉइल पाठलाग सुरू केला. मात्र त्याचवेळी बारामतीकडे चाललेले वाचलंदनगर पोलिस स्टेशनचे पोलिस व बारामतीहून आलेले पोलीस यांनी पळून चाललेल्याअज्ञात व्यक्तीस पकडले.

ST Bus Crime
Pune Crime: मोबाईल मागितल्याने इतकं मारलं की कामगाराने जीव गमावला, पुण्यातील सराईत गुन्हेगाराचे कृत्य

या हल्ल्याची खबर बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांना समजतात तेही तातडीने घटनास्थळाकडे निघाले. त्यांच्याबरोबर पोलीस निरीक्षक वैशाली पाटील व पोलीस उपनिरीक्षक कल्याण शिंगाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपीस ताब्यात घेतले व जखमींना प्राथमिक उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र काटेवाडी येथे उपचार करून गंभीर जखमी झाल्याने बारामतीच्या शासकीय रुग्णालयात पाठवले. तर अज्ञात व्यक्तीलाही ताब्यात घेतले आहे जखमी पवन गायकवाड हा जळोची(ता.बारामती येथील रहिवास आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news