Parth Pawar NCP Meeting: पार्थ पवारांच्या बैठकीत नेमकं काय घडलं? आमदारांना काय विचारलं? मांडेकरांनी बाहेर येताच केला मोठा खुलासा

Parth Pawar NCP Meeting: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान खासदार पार्थ पवार यांनी पुण्यात अजित पवार गटातील आमदारांची बैठक बोलावली.
Parth Pawar NCP Meeting
Parth Pawar NCP MeetingPudhari
Published on: 
Updated on: 

Parth Pawar NCP Meeting: राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेग आला असतानाच पुण्यात राजकीय घडामोडींना सुरुवात झाली आहे. खासदार पार्थ पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) मधील पुणे जिल्ह्यातील आमदारांची बैठक बोलावली होती. पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. या बैठकीत विलीनीकरणाच्या मुद्द्यावर आमदारांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

या बैठकीला आमदार शंकर मांडेकर, चेतन तुपे, माऊली कटके यांच्यासह पुणे जिल्ह्यातील काही आमदार उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण व्हावे का, त्यासाठी ही योग्य वेळ आहे का, तसेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदारांना फोन आले होते का, असे प्रश्न बैठकीत विचारण्यात आल्याची माहिती आहे.

मात्र, बैठकीत विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे आमदार शंकर मांडेकर यांनी स्पष्ट केले. बैठकीतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी 'पुढारी'शी बोलताना आपली भूमिका मांडली. "आम्ही दरवर्षी दिवाळीच्या निमित्ताने भेटत असतो. यावेळीदेखील त्याचप्रमाणे भेटण्यासाठी आलो होतो. बैठकीत विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही," असे मांडेकर यांनी सांगितले.

Parth Pawar NCP Meeting
Raj Thackeray: 'शांत आहोत म्हणजे आम्ही XXX नाही', छठ पूजेवरुन राज ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका; मराठी जनतेला सतर्क राहण्याचे आवाहन

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये विलीनीकरणाबाबत चर्चा सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. पुणे जिल्ह्यातील आमदारांची मते आणि त्यांच्या मनात विलीनीकरणाबाबत काय विचार आहेत, हे जाणून घेण्यासाठी पार्थ पवार यांनी ही बैठक बोलावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती.

एकीकडे मुंबईत शरद पवार यांच्या गटाची बैठक सुरू असताना दुसरीकडे पुण्यात अजित पवार यांच्या गटातील आमदारांची बैठक होत होती. त्यामुळे या दोन्ही बैठकांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.

Parth Pawar NCP Meeting
Pune Municipal Corporation Bomb Threat: पुणे महापालिकेला बॉम्बस्फोटाची धमकी; मुख्यालय रिकामे, बॉम्बशोधक पथकाकडून तपासणी

मात्र, बैठकीनंतर आमदार शंकर मांडेकर यांनी विलीनीकरणाबाबत चर्चा झाल्याचे नाकारल्याने राजकीय चर्चांना आणखी वेगळे वळण मिळाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण होणार का आणि त्याबाबत आमदारांची नेमकी भूमिका काय आहे, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.