

पुणे : पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे (सीबीएसई) नाव, बोधचिन्ह वापरणारी तीस बनावट खाती एक्स या समाजमाध्यमावर असल्याचे निदर्शनास आले आहे. या खात्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून, अधिकृत माहितीसाठी केवळ अधिकृत खात्याचाच वापर करण्याचे आवाहन सीबीएसईकडून करण्यात आले आहे. सीबीएसईने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
एक्स या समाजमाध्यमावरील काही खात्यांकडून सीबीएसईच्या नावाचा किंवा बोधचिन्हाचा वापर करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. परंतु ही खाती बनावट असल्याने नागरिकांची दिशाभूल होऊ शकते. या पार्श्वभूमीवर सीबीएसईने या बनावट खात्यांबाबतची माहिती जाहीर केली. ललीशळपवळर29 हेच सीबीएसईचे अधिकृत खाते असून, या खात्याद्वारे देण्यात येणारी माहिती अधिकृत असल्याचे स्पष्ट केले. तसेच सीबीएसईचे नाव आणि बोधचिन्ह वापरून अन्य खात्यांकडून दिली जाणारी माहिती अधिकृत नाही, त्यासाठी सीबीएसई जबाबदार नसल्याचेही नमूद केले आहे.
हेही वाचा