Cheese Analog: पनीरच्या नावाखाली ‘चीज अनालॉग’; हॉटेलमध्ये ग्राहकांची सर्रास फसवणूक

एफडीएकडे तक्रारी वाढल्या; पनीरऐवजी स्वस्त पर्यायाचा वापर करून ग्राहकांची दिशाभूल
Cheese And Paneer
Cheese And PaneerPudhari
Published on
Updated on

पुणे: हॉटेलमध्ये गेल्यावर पनीरची भाजी तुम्ही आवडीने खात असाल. अगदी पिझ्झा, बर्गर, सँडविच, रोल्स अशा पदार्थांमध्ये पनीर आवडीने घेतले जाते. मात्र, पनीर म्हणून जो पदार्थ तुम्ही खाता ते नक्की पनीरच आहे का, असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाही नसेल. पण, आता तुम्हाला हे हॉटेलमध्ये गेल्यावर विचारावे लागेल; कारण पनीरच्या नावाखाली चीज अनालॉग देऊन सरार्सपणे फसवणूक करण्याचे प्रकार सुरू आहेत.

Cheese And Paneer
Pune NDA Women Cadets: एनडीएच्या 150 व्या दीक्षान्त सोहळ्यात महिला कॅडेट्सची तिसरी तुकडी सज्ज

अन्नपदार्थांमधील भेसळ हा गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे अनेक दुर्धर स्वरूपाचे आजार वाढत चालले आहेत. त्यातच आता आपण अन्नपदार्थांमध्ये आवडीने खाणाऱ्या पनीरमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ असल्याचे अनेकदा ऐकतो. मात्र, सद्यःस्थितीला पनीरच्या नावाखाली सर्वत्र चीज अनालॉग हा पदार्थ देऊन फसवणूक केली जात असल्याचे समोर आले आहे. याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी वाढल्या आहेत.

Cheese And Paneer
Baramati Aaple Sarkar Portal Issue: ‘आपले सरकार’ पोर्टलच्या बिघाडामुळे विद्यार्थी-पालक हैराण

‌‘चीज अनालॉग‌’ हा दुग्धजन्य पदार्थ नसून, त्यामध्ये वनस्पतीजन्य तेल, स्टार्च आणि इतर घटकांचा वापर केला जातो. त्यामुळे त्याची पौष्टिकता आणि गुणवत्ता पनीरपेक्षा वेगळी असते. तरीही हॉटेलमध्ये आणि केटर्सचालकांकडून ग््रााहकांना माहिती न देता सरार्सपणे त्याचा वापर सुरू आहे. ग््रााहकांमध्ये याबाबत जागरुकता नसल्याने पनीर म्हणून चीज अनालॉग खाल्ले जात आहे. मात्र, आता अन्न व औषध प्रशासन विभागाकडून याबाबत ग््रााहकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी कार्यवाही केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

Cheese And Paneer
Pirangut Ghat Garbage: पिरंगुट घाटात कचऱ्याचा डोंगर; परिसर डम्पिंग ग्राउंडमध्ये रूपांतरित

पनीर म्हणजे काय?

  • पनीर हे थेट दुधापासून तयार केलेले दुग्धजन्य पदार्थ आहे.

  • दूध फाडून त्यातील घट्ट भाग दाबून पनीर तयार केले जाते.

  • यात नैसर्गिक प्रोटीन, कॅल्शियम आणि दुधातील पोषक घटक असतात.

चीज अनालॉग म्हणजे काय?

हे खरे चीज किंवा पनीर नसते. यामध्ये वनस्पती तेल, स्टार्च, इमल्सिफायर, फ्लेवर आणि दूध पावडर यांचे मिश्रण असते. उत्पादन स्वस्त पडावे आणि जास्त काळ टिकावे म्हणून याचा वापर होतो. ते पिझ्झा, बर्गर, सँडविच, रोल्समध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाते.

Cheese And Paneer
Maharashtra Sugar Industry FRP MSP Issue: एफआरपी वाढली, पण एमएसपी स्थिर; साखर उद्योगात चिंता

दोन्हीमधील फरक कसा ओळखायचा?

  • पनीर पटकन पूर्ण वितळत नाही.

  • चीज अनलॉग गरम केल्यावर स्ट्रेची आणि चिकट होते.

  • पनीरची चव सौम्य आणि दुधाळ असते.

  • चीज अनालॉगमध्ये कृत्रिम खारट किंवा प्रोसेस्ड टेस्ट जाणवू शकते.

  • पनीर हाताने मोडल्यास तुकडे पडतात.

  • चीज अनालॉग रबरासारखे ताणले जाऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news