Pirangut Ghat Garbage: पिरंगुट घाटात कचऱ्याचा डोंगर; परिसर डम्पिंग ग्राउंडमध्ये रूपांतरित

भुकूम–भुगाव परिसरात अस्वच्छतेचा विळखा; घाट मार्गावर प्लास्टिक व घरगुती कचऱ्याचा मोठा साठा
Pirangut Ghat Garbage
Pirangut Ghat GarbagePudhari
Published on
Updated on

विनोद माझिरे

पिरंगुट: मुळशी तालुक्यातील भुगाव, भुकूम, पिरंगुट घाट आणि घोटावडे फाटा परिसरात मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात असून घाट परिसर डम्पिंग ग््रााउंड बनल्याचे चित्र दिसत आहे. काही फळविक्रेते, भाजीविक्रेते तसेच नागरिकांकडून दुकानातील आणि घरगुती कचरा रस्त्याच्या कडेला फेकला जात असल्याने परिसर अस्वच्छ झाला आहे.

Pirangut Ghat Garbage
Maharashtra Sugar Industry FRP MSP Issue: एफआरपी वाढली, पण एमएसपी स्थिर; साखर उद्योगात चिंता

कोलाड महामार्गावरील पिरंगुट घाटात मोठ्या प्रमाणावर कचरा साचला असून, नागरिक प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये घरगुती कचरा भरून घाटात टाकत आहेत. ग््राामपंचायतीकडून वारंवार कचरा उचलला जात असला तरी पुन्हा त्याच ठिकाणी कचरा टाकला जात असल्याचे दिसत आहे.

Pirangut Ghat Garbage
Pune Shivajinagar Court Reading Room: शिवाजीनगर न्यायालयातील पक्षकार वाचनालय पुस्तकांविना ओस

म्हसोबा खिंडीतून लवासाकडे जाणाऱ्या रस्त्यालगतही मोठ्या प्रमाणावर कचरा फेकण्यात आला आहे. यामध्ये पीओपी साहित्य, लग्नसमारंभातील सजावटीचे साहित्य आणि फळांच्या प्लास्टिक वेष्टनांचा समावेश आहे. स्थानिकांच्या मते, कचरा टाकणाऱ्यांमध्ये बाहेरून नोकरी-व्यवसायासाठी आलेल्या नागरिकांचा मोठा सहभाग आहे. घाट परिसरातील कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरत असून, पर्यटक आणि स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच काही दुकानदार आणि हॉटेल व्यावसायिकही कचरा पोती व प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरून रस्त्याच्या कडेला टाकत असल्याचे दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news