

पुणे : पुढारी वृत्तसेवा
पुण्यातील राशी राजीव शहा हिने चित्रित केलेली दोन चित्रे जर्मनीच्या गोएथ इन्स्टिट्यूट मॅक्समुलर भवनच्या यावर्षीच्या दिनदर्शिकेसाठी निवडण्यात आली आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची इमारत आणि जनरल पोस्ट ऑफिसच्या इमारतीची चित्रे राशीने रेखाटली आहेत. तिची हीच दोन चित्रे दिनदर्शिकेसाठी निवडली गेली आहेत. दोन्ही इमारती ब्रिटिशकालीन असून, पूर्णपणे ब्रिटिश शैलीत अत्यंत देखण्या पद्धतीने बांधण्यात आल्या आहेत.
राशीने आपल्या कुंचल्यांतून वेगळ्या शैलीत या वास्तूंना चित्रबद्ध केले असून, तिच्या या कलेची दखल घेत चित्रांची निवड केली आहे. राशी सिम्बायोसिस महाविद्यालयात अकरावीत (वाणिज्य शाखा) शिकत आहे.