.. अन्यथा, आम्ही टर्मिनलचे उद्घाटन करू : काँग्रेसचा इशारा

.. अन्यथा, आम्ही टर्मिनलचे उद्घाटन करू : काँग्रेसचा इशारा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : लोहगाव विमानतळावरील नूतन टर्मिनल 15 तारखेपर्यंत सुरू न केल्यास 16 जानेवारीला आम्ही टर्मिनलचे उद्घाटन करू, असा इशारा काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी दिला आहे. विमान प्रवाशांची संख्या वाढू लागल्याने 525 कोटी रुपये खर्चून लोहगाव विमानतळावर नवे टर्मिनल उभारण्यात आले. या नवीन टर्मिनलचे काम ऑगस्ट 2023 पूर्वीच पूर्ण झाले, चाचण्याही झाल्या. त्यामुळे हे टर्मिनल कार्यान्वित व्हावे, यासाठी विमान प्रवाशांनी सोशल मीडियाद्वारे केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालय आणि एअर पोर्ट अ‍ॅथॉरिटीचे लक्ष वेधले.

नव्या टर्मिनलचे उद्घाटन सप्टेंबरमध्ये होईल, असे हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी जाहीर केले. मात्र, या टर्मिनलचे उद्घाटन झाले नाही. या टर्मिनलचे 1 जानेवारीपूर्वी उद्घाटन न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसच्या वतीने देण्यात आला होता.
यानंतर जोशी यांच्यासह आमदार रवींद्र धंगेकर, दत्ता बहिरट, सुनील मलके यांनी पुणे विमानतळ प्राधिकरणाच्या संचालकांना भेटून गुलाब पुष्प आणि निवेदन देत गांधीगिरी मार्गाने आंदोलन केले. तसेच, नवीन टर्मिनलचे 15 जानेवारीपर्यंत उद्घाटन न केल्यास 16 जानेवारीला आम्ही उद्घाटन करू, असा इशारा दिला.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news