

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : चिंचवड स्टेशनवरून चिंचवडगावाकडे जाणारा उड्डाण पुलाची डागडुजीचे काम सुरू आहे. त्यामुळे चिंचवडगावाकडे जाणारा मार्ग बंद ठेवण्यात आला असून, एकच मार्ग वाहतुकीस खुला ठेवण्यात आला आहे. त्यामुळे सकाळी तसेच सायंकाळी वर्दळीच्या वेळी उड्डाण पुलावार वाहतूककोंडी होत आहे. वाहनचालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.
महावीर चौकातून चिंचवडगावाकडे जाणार्या मार्गावरील जुना रेल्वे पूल हा कमकुवत झाला आहे. त्यामुळे या पूलाच्या डागडुजीचे काम पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी चिंचवडगावाकडे जाणारा रस्ता 31 जुलैपर्यंत बंद ठेवण्यात येणार असून, वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिस आणि महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
महावीर चौकाकडून चिंचवडगावाकडे जाणारी जड व अवजड वाहनांना पुलावरुन लोकमान्य हॉस्पिटल चौकात जाण्यास बंदी करण्यात करण्यात आली आहे. याला पर्यायी मार्ग-महावीर चौक-खंडोबा माळ, भक्ती शक्ती येथून बिजलीनगरमार्गे रिव्हर व्ह्यू चौक मार्गे इच्छितस्थळी जातील. महावीर चौकाकडून चिंचवडगांवाकडे जाणारी दुचाकी, हलक्या वाहनांना पुलावरुन लोकमान्य हॉस्पिटल चौकात जाण्यास बंदी करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग महावीर चौकाकडून खंडोबा माळ चौकातून डावीकडे वळून चिंचवडगावमार्गे इच्छितस्थळी जातील. या आदेशाची अंमलबजावणी 31 जुलै 2023 पर्यंत करण्यात येणार आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करून वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस आणि पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
हे ही वाचा :