पुणे : वारसा नसतानाही यशाचे शिखर गाठता येते : शत्रुघ्न सिन्हा

पुणे : वारसा नसतानाही यशाचे शिखर गाठता येते : शत्रुघ्न सिन्हा
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : रंग, रूप व कोणताही वारसा नसतानासुद्धा मी चित्रपटविश्वात व नंतर राजकारणातसुद्धा खूप यशस्वी झालो. त्यामुळे महिलाही कला, क्रीडा व उद्योग यांसह विविध क्षेत्रांत जिद्द आणि प्रचंड महत्त्वाकांक्षा ठेवल्यास प्रतिकूल परिस्थितीतही यशाचे शिखर गाठू शकतात, असा विश्वास महिला उद्योजिकांना सुप्रसिध्द अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी दिला.

ते पुण्यात फिक्की महिला उद्योजिका परिषदेत बोलत होते. या वेळी शत्रुघ्न सिन्हा यांनी आपल्या आयुष्यातील अनेक घटना आणि आठवणी उपस्थित महिलांना सांगितल्या. तसेच, महिलांच्या विविध प्रश्नांना त्यांनी उत्तरे देत संवादही साधला. या वेळी अभिनेते जॅकी श्रॉफ व शत्रुघ्न सिन्हा यांच्या हस्ते विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्‍या महिलांचा विशेष सन्मान करून त्यांना फिक्की पुणेच्या वतीने विशेष पुरस्कार देण्यात आले.

या वेळी फिक्की पुणेच्या अध्यक्षा नीलम सेवलेकर यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी फिक्की महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा जयंती दालमिया, पुणे अध्यक्षा नीलम सेवलेकर, उपाध्यक्षा रेखा मगर, खजिनदार सोनिया राव, पिंकी राजपाल यांसह फिक्की पदाधिकारी, देशभरातील महिला उद्योजिका मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news