
उरुळीकांचन: अश्लील फोटो व्हायरल करण्याची भीती दाखवून ब्लॅकमेल करून महिलेवर वारंवार बलात्कार करणाऱ्या दोघांना उरुळी कांचन पोलिसांनी अटक केली आहे.
पेठचा माजी सरपंच सुरज चौधरी व त्याचा सावकार मित्र राजेश चौधरी यांच्यावर बलात्कारासह जीवे मारण्यासाठी मानसिक छळ सायबर गुन्हे नियंत्रण कायद्याअंतर्गत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत. या दोघा नराधमांना उरुळीकांचन पोलिसांनी शनिवार (दि.५ ) रात्री उशीरा अटक केली आहे. (Latest Pune News)
या दोघांनी जिवलग मित्राच्यासोबत राहून मित्राला आर्थिक प्रलोभने दाखवून ५ ते ६ लाख रुपये दिले. मित्राने ही दिलेली रक्कम परत करत नाही म्हणून माजी सरपंच असलेल्या सुरज चौधरी याने मित्राच्या बायकोला आपल्या सावकार मित्र राजेश चौधरीसह मित्रत्वाच्या नात्यातील संबंधांचा गैरफायदा घेऊन मित्राच्या पत्नीचे अश्लील फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची भिती दाखवून या दोघांनी मित्राच्या पत्नीवर वेळोवेळी बलात्कार करण्याचा धक्कादायक प्रकार पेठ (ता.हवेली ) येथे उघडकीस आला आहे.
या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट ) च्या पदाधिकारी व सावकार मित्राला उरुळीकांचन पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल होऊन अटक झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी पिडीत महिलेने पतीसह उरुळीकांचन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत महिला या दोघा आरोपींच्या मित्राची पत्नी आहे. आरोपी राजेंद्र चौधरी हा महिलेच्या पतीचा मित्र असल्याने महिलेच्या घरी ये -जा करत होता. या महिलेचा पती असलेल्या मित्राला आर्थिक देवाघेवाणीतून या व्यवहारातून तो ५ ते ६ लाख रुपये दिलेल्या रक्कमेची मागणी करीत होता.
यावर मित्राने या आर्थिक व्यवहारात असलेल्या रक्कमेचा गैरफायदा घेऊन माझ्याकडे तुझे अश्लील फोटो आहेत ते व्हायरल करेन म्हणून भिती दाखविण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने तिला गावात बोलवून त्याच्या स्वीफ्ट गाडीत बसवून तिला लोणीकाळभोर येथे लॉज मध्ये नेऊन बळजबरीने संबंध प्रस्थापित करण्यास भाग पाडले.
त्यानंतरही भांडगाव(ता.दौंड) येथे नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध संबंध ठेवले. त्यानंतर पिडीत महिलेची इच्छा नसताना तिच्या अकाउंटवर ५ ते ६ लाख रुपये सोडले. त्यानंतर तिच्याकडून पतीच्या सहीत तिला दिलेल्या रक्कमेची मागणी करु लागला. त्यानंतर पिडीतेने ८ लाख रुपये आरोपी राजेश चौधरीला देऊन त्याला फोटो डीलीट करण्यास सांगितले.
त्यानंतर त्याने उर्वरित रक्कमेसाठी तगादा लावून पिडीत महिलेला पतीसह मुलाला जीवे मारुन टाकण्याची धमकी दिली आहे. दुसरा आरोपी माजी सरपंच सुरज चौधरी याने या पिडीत महिलेला बोलावून तुझ्याशी चर्चा करायची म्हणून तुझे नग्न फोटो राजेश चौधरी याने काढले आहेत. ते फोटो दाखविल म्हणून भिती दाखवून पिडीत महिलेशी शाररीक संबंध ठेवले आहेत. या दोघांनी २० फेब्रुवारी २०२३ ते २८ एप्रिल २०२५ पर्यंत हा प्रकार केला आहे.
महिलेला मारहाण
दरम्यान या गुन्ह्याची तक्रार उरुळीकांचन पोलिस ठाण्यात झाल्यानंतर यामहिलेला तक्रार दिली म्हणून मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सई मटाले या करीत आहेत.