
नारायणगाव: आळेफाटा येथील अनंतराव चौगुले रमेश चौगुले व सुरेश चौगुले या तिघांच्या घरी रविवारी (दि. ६) पहाटे दोन वाजता सुमारास चोरीची घटना घडली. अनंतराव चौगुले यांच्या घरामध्ये त्यांच्या आई, पत्नी व त्यांचा भाऊ घरी होते. चौगुले यांच्या घराचा मागचा दरवाजा तोडून व कॅमेरे बंद करून या चोरट्यांनी आत प्रवेश मिळवला.
देवघरात असलेले जड कपाट त्यांनी दरवाजा तोडून बाहेर नेऊन बाजूच्या शेतात नेऊन टाकले. चौगुले यांच्या घरातील चांदीचे देवाचे साहित्य व रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केले. दरम्यान घटनेची माहिती समजतात आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. (Latest Pune News)
आनंदराव चौगुले यांच्या बंगल्यामध्ये दोन वर्षांपूर्वी अशाच प्रकारची चोरी झाली होती त्यामुळे ज्या चोरट्याने चोरी केली होती त्यांनीच आता यावेळी चोरी केली असावी असा प्राथमिक अंदाज अनंतराव चौगुले यांनी व्यक्त केला आहे. सुमारे साडेतीन किलो वजनाचे देवपूजेचे साहित्य व एक तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. तसेच घरात असलेले ५० हजार रुपये घेऊन ते पसार झाले.
दरम्यान आळेफाटा परिसरामध्ये दिवसाढवळ्या चोरी होऊ लागल्याने जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.