पुणे : पुढारी वृत्तसेवा : एमएचटी सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांना राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटी सेलद्वारे पीसीबी आणि पीसीएम ग्रुपची उत्तरतालिका उपलब्ध करून दिली आहे. तसेच उत्तरतालिकेतील उत्तरांसदर्भात काही आक्षेप असतील तर ते सशुल्क नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 करीता अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र व कृषी शिक्षण पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरीता 22 ते 30 एप्रिल दरम्यान पीसीबी ग्रुप आणि 2 मे ते 16 मे दरम्यान पीसीएम ग्रुपची सीईटी परीक्षा घेण्यात आली.
या परीक्षेची उत्तर तालिका आणि उमेदवारांनी सोडविलेली प्रश्नपत्रिका संबंधित विद्यार्थ्यांच्या लॉगीन आयडीवर प्रसिद्ध केली आहे.
प्रसिद्ध केलेल्या प्रश्नपत्रिकांमधील प्रश्न आणि उत्तर तालिका यांच्यावर आक्षेप असल्यास पोर्टलवर जावून प्रति आक्षेप एक हजार रुपये भरुन आक्षेप नोंदविण्यासाठी पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले आहे. पीसीबी ग्रुपसाठी 22 ते 24 मे आणि पीसीएम ग्रुपसाठी 24 ते 26 मेपर्यंत संधी देण्यात आली आहे. दिलेल्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना आक्षेप नोंदविता येणार आहे. विद्यार्थ्यांनी नोंदविलेल्या आक्षेपांचा विचार करून त्यानंतर एमएचटी सीईटीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
हेही वाचा