महत्वाची बातमी! आता एका क्लिकवर मिळणार जातवैधता प्रमाणपत्र

प्रणालीत एआय आधारित आधारसह एकत्रीकरण असणार
Pune News
एका क्लिकवरPudhari
Published on
Updated on

पुणे: जातवैधता प्रमाणपत्र हे लवकरच एका क्लिकवर मिळणार आहेत. त्यासाठी टाटा कन्सल्ट्न्सी सर्व्हिसेस (टीसीएस) कंपनी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थांच्या (बार्टी) वतीने ऑनलाइन प्रणाली विकसित करण्यात येणार आहे. त्याबाबतच्या प्रस्तावाला राज्य शासनाने तत्त्वत: मान्यता दिली आहे.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील नागरिकांना सरकारी नोकरी, शैक्षणिक, निवडणूक आणि सरकारच्या मागासवर्गीयांसाठी राखीव ठेवलेल्या अन्य कोणत्याही प्रयोजनांसाठी मागासवर्गीय आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी जात प्रमाणपत्र, जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. (Latest Pune News)

Pune News
Pune Rain: पुण्यात पावसाची दमदार बॅटिंग; उकाड्यापासून काहीसा दिलासा

जात प्रमाणपत्र, जातवैधता प्रमाणपत्र मिळविण्याच्या प्रक्रियेदरम्यान बहुतांश अर्जदारांना अधिनियमातील तरतुदीनुसार कागदपत्रांची पूर्तता करण्यास अडचणी येतात. प्रचलित कार्यपद्धतीमुळे जातप्रमाणपत्र, जातवैधता प्रमाणपत्र वेळेत मिळण्यास विलंब होतो. त्यामुळे अर्जदारांना अनेक अडचणींना सामना करावा लागतो.

या पार्श्वभूमीवर 100 दिवसांचा कृती आराखडा तयार करण्याच्या अनुषंगाने घेतलेल्या आढावा बैठकीत संगणकीय ऑनलाइन प्रणाली विकसित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कामाची उच्चस्तरीय व्याप्ती- एखाद्या नागरिकाला त्याच्या स्थानिकतेशी संबंधित अर्जासाठी विनंती करण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी प्रणालीत नियम आधारित इंटरफेस असणार आहे.

या प्रणालीत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित आधारसह एकत्रीकरण असणार आहे. यात नाव, वडील किंवा पतीचे नाव, आधारमध्ये नमूद केलेले मूळस्थान यांसारख्या मुलभूत माहितीसाठी तपासणी होईल आणि कागदपत्रांच्या पडताळणीसाठी डीजी लॉकरसह एकत्रीकरण असणार आहे.

‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) कंपनीने सादर केलेला प्रस्ताव बार्टीने राज्य सरकारला प्रस्ताव दाखल केला होता. या प्रस्तावाला राज्य शासनाने तत्त्वत: मान्यता दिली आहे. ही प्रणाली दोन महिन्यांत कार्यान्वित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Pune News
Pudhari Impact: बेट उभारण्याच्या कामाला अखेर स्थगिती; कात्रज तलावातील आता केवळ गाळा काढणार

ही प्रणाली विकसित करण्यासाठी ‘टीसीएस’ला 25 कोटी रुपयांपर्यंत निधी देण्यात येणार आहे. पाच वर्षे प्रशिक्षण, देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी ‘टीसीएस’ या कंपनीवर असणार आहे. असे सामाजिक न्याय व विशेष साह्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनी आदेशात नमूद केले.

अशी असेल प्रणाली

  • नागरिकांना प्रत्यक्ष तपासणीसाठी ऑनलाइन पद्धतीने पसंतीचे स्लॉट निवडण्याची सुविधा.

  • टोकनद्वारे ठरावीक दिवस व वेळेची स्लॉटसह व्यवस्था.

  • प्रमाणपत्रात एक एम्बेड केलेले छायाचित्र असेल, यामुळे गैरवापराला चाप बसेल.

  • नागरिकांच्या प्रत्यक्ष भेटीदरम्यान छायाचित्र घेण्याची सुविधा आणि घेतलेले छायाचित्र नागरिकांच्या अर्जासोबत अपलोड केलेल्या छायाचित्राशी जुळविले जाईल.

  • आधार आणि डिजी लॉकरद्वारे विनंतीची पडताळणी करण्याची सुविधा.

  • प्रणालीत मोबाइल आधारित सेवा उपलब्ध आणि वॉट्सअ‍ॅप आधारित सेवा सक्रीय करता येणार

  • जात प्रमाणपत्र तसेच इतर आवश्यक कागदपत्रांची माहिती मिळविण्यासाठी संबंधित विभागांसोबत अ‍ॅप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस (एपीएआय) एकत्रीकरण.

  • शैक्षणिक कागदपत्रे, जन्म प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रे थेट डिजिटल लॉकर आणि सरकारी डाटाबेसमधून स्वयंचलितपणे प्राप्त आणि वैध करण्यासाठी डिजिटल लॉकर आणि शासकीय अभिलेखांचे एकत्रीकरण.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news