

Pune Monsoon Update
पुणे: गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असताना आज पुण्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे वातावरणात बदल होऊन गारवा निर्माण झाला असून पुणेकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे.
तर दुसरीकडे पावसामुळे कामानिमित्त बाहेर पडलेल्या पुणेकरांचे हाल झाले. पुण्यातील रस्त्यांवरील वाहतूक कोंडी आणि साचलेले पाणी यातून मार्ग काढताना नागरिकांची तारांबळ उडाली होती. पुण्यात पुढील काही दिवस पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.(Latest Pune News)
आज साकळपासूनच शहराच्या सर्वच भागांमध्ये ढगाळ वातावरण होते आणि दुपारनंतर अनेक भागांत जोरदार पावसाला सुरुवात झाली. सूस, पाषाण, बाणेर, बावधन, शिवाजीनगर,कोथरूड, हडपसर, कात्रज, बाणेर, डेक्कन या परिसरात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात जोरदार पावसाने हजेरी लावली.
अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडलेली पाहायला मिळाली. दुचाकीवरून जाणाऱ्या प्रवाशांना रस्त्याच्या बाजूला थांबून आसरा घ्यावा लागला. काही भागांत विजांसह सरी कोसळल्या, ज्यामुळे काही काळासाठी वीजपुरवठा आणि वाहतूक यंत्रणा काहीशी विस्कळीत झाली. तर काही ठिकाणी झाडाची फांदी पडून कारचं नुकसान, झाल्याची देखील घटना घडली आहे.
13 आणि 14 मे रोजी राज्यातील बहुतांश भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. राज्यात वाऱ्याचा वेग वाढला असून ताशी 50 ते 60 कि.मी वेगाने वारा वाहत आहे.
नारायणगाव 54,लवळे 48.7,हडपसर 22.5,शिवाजीनगर 18.7, पाषाण 17.1,कात्रज 23.8, खडकवासला 10.8, दौड 15, राजगुरुनगर 11, भोर 14.5, डुडुळगाव 14.5, माळीन 6, एनडीए 6, कुरवंडे 3.5,चिंचवड 0.5,लोहगाव 0.2, कोरेगावपार्क 2,वडगावशेरी 1.5