आता भारतीय कपड्यातच करा पदवीदान समारंभ : यूजीसीचे विद्यापीठांना निर्देश

आता भारतीय कपड्यातच करा पदवीदान समारंभ : यूजीसीचे विद्यापीठांना निर्देश

पुणे : पुढारी वृत्तसेवा : देशभरातील विद्यापीठे आणि उच्च शैक्षणिक संस्थांच्या दीक्षान्त समारंभासाठी विशिष्ट पद्धतीचा ड्रेसकोड विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच 'यूजीसी'ने निश्चित केला आहे. त्यानुसार हातमागावर तयार केलेले भारतीय कपडेच विद्यार्थ्यांनी दीक्षान्त समारंभात परिधान करावेत, असे निर्देश 'यूजीसी'ने दिले आहेत. यूजीसी'चे सचिव प्राध्यापक मनीष जोशी यांनी यासंदर्भात सर्व विद्यापीठे आणि राज्यांच्या कुलगुरूंना पत्र पाठवले आहे. दीक्षान्त समारंभाच्या ड्रेसकोडमध्ये भारतीय हातमाग किंवा हातमागाचा पोशाख समाविष्ट करावा. हे कपडे परिधान केल्याने

विद्यार्थ्यांना भारतीय असल्याचा अभिमान वाटेल. याशिवाय ग्रामीण भागात रोजगाराच्या संधीही वाढणार आहेत, असे या पत्रात म्हटले आहे. दरम्यान, आयआयटी, एनआयटीसह अनेक विद्यापीठांनी त्यांच्या राज्यातील पारंपरिक पोशाख परिधान करून पदवी प्रदान करण्याचा प्रघात सुरू केला आहे. याआधी 2017-18 मध्ये, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने उच्च शैक्षणिक संस्थांना पारंपरिक काळा कोटऐवजी भारतीय पोशाख परिधान करण्याचे निर्देश दिले होते. यामध्ये पुरुष कुर्ता-पायजमा किंवा धोतर घालू शकतात आणि महिला सूट-सलवार किंवा साडी परिधान करू शकतात, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news