कुलभूषण जाधव यांच्या अपहरणात ‘जेएए’चा हात

कुलभूषण जाधव यांच्या अपहरणात ‘जेएए’चा हात

पुढारी वृत्तसेवा :

इराणच्या वतीने पाकिस्तानातील बलुचिस्तानमधील जैश अल अदल (जेएए) या दहशतवादी संघटनेच्या तळावर हवाई हल्ला करण्यात आला. जेएए या सुन्नीपंथीय संघटनेच्या घातपाती कारवाया आणि ठावठिकाण्याबाबत थोडक्यात माहिती…

  • जेएएचा म्होरक्या अब्दुल रहीम मुल्लाह जादेह आहे. त्याच्या ठावठिकाण्याबद्दल कुणालाही माहिती नाही. त्यांचे छायाचित्रही अद्याप उपलब्ध झालेले नाही.
  • इराण सीमेला लागून असलेल्या पंजगूर या ठिकाणी इराणने हवाई हल्ला केला. बलुचिस्तानातील कोह-सब्ज या ठिकाणी जेएएच्या दहशतवाद्यांचा अड्डा आहे.
  • जैश अल अदलचा अर्थ आर्मी फॉर जस्टीस आहे. सुन्नीपंथीय दहशतवादी संघटना आहे. पाकिस्तान आणि इराणच्या पहाडी भागात या संघटनेच्या दहशतवाद्यांनी आश्रय घेतला आहे.
  • बलुचिस्तान प्रांत आणि हिंदी महासागराला लागून असलेल्या इराणकच्या नैऋत्यकडील सिस्तान आणि बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी या दहशतवादी संघटनेचा लढा सुरू असल्याचे मानले जाते.
  • 2013 मध्ये इराणच्या सीमा सुरक्षा दलावर या संघटनेने हल्ला करून इराणच्या सैनिकांचे अपहरण केले होते. डिसेंबरमध्ये इराणच्या रस्क शहरातील पोलिस ठाण्यावर केलेल्या हल्ल्यात 11 पोलिसांचा मृत्यू झाला होता.
  • बलुचिस्तनातील जुनदल्लाह या दहशतवादी संघटनेची दुसरी शाखा म्हणूनही जेएएची ओळख आहे. 2012 मध्ये या संघटनेने जेएए असे नाव ठेवले. 4 नोव्हेंबर 2010 रोजी अब्दुल मलिक रेगी याने स्थापन केलेल्या जुनदल्लाहवर अमेरिकेने बंदी घातली. इराणने रेगी याचा खात्मा केला.
  • यानंतर जेएएने दहशतवादी कारवायात वाढ केली. या संघटनेवर बंदी घालण्यासाठी अमेरिकेच्या हालचाली सुरू आहेत.
  • पिपल्स रेझिस्टंटस् ऑफ इराण म्हणूनही जेएए सक्रिय आहे. इराण, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात जेएएचे दहशतवादी सक्रिय आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news