PMJY: प्रधानमंत्री जनआरोग्य योजना- महात्मा फुले योजना लाभ मिळत नाही? आधी तातडीने हे काम करा

pmjay and mjpjay: या योजनेस पात्र होण्यासाठी अनेक नागरिकांचे रेशन कार्ड अपडेट नाहीत
Pune news
योजनेस पात्र होण्यासाठीpudhari
Published on
Updated on

pmjay and mjpjay

पुणे : प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले योजना एकत्र राबवण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेस पात्र होण्यासाठी अनेक नागरिकांचे रेशन कार्ड अपडेट नाहीत. त्यामुळे अनेकदा या योजनेचा लाभ घेण्यास अडचणी येतात. त्यामुळे नागरिकांनी ते अपडेट करून घ्यावे. जर कार्ड चालू नसेल तर चालू करून घ्या, असे आवाहन आयुष्मान भारत मिशन समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी केले. शुक्रवारी पुण्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सध्या पुण्यात १७८ हॉस्पिटल आहेत १२५ सुपर स्पेशिलिटी हॉस्पिटल आहेत. तर २५ सरकारी हॉस्पिटल आहे. यातील हॉस्पिटलबाबत मध्यंतरी काही घटना घडल्या. हॉस्पिटलच्या अतिरेकी व्यवस्थापनाचा लोकांना त्रास होऊ नये यासाठी हॉस्पिटल बोलावून बैठक घेतली आहे. तसेच रुग्णांच्या हितासाठी एका समितीची नेमणूक केली आहे. हॉस्पिटलच्या नियमात सुधारणा करण्यासाठी ही समिती अहवाल सादर करेल. त्यानंतर त्याचे बदलेले स्वरूप दिसेल. या समितीमध्ये ४१८० हॉस्पिटलचा समावेश आहे, असंही शेटेंनी सांगितले.

शासनाच्या आरोग्य योजनांबाबत बोलताना ते म्हणाले, योजनेचा लाभ मिळाला नाही तर त्याचे खापर सरकारवर फोडण्याऐवजी कार्ड काढून घ्यावे.

Pune news
Pcmc News: मुळा नदी सुधार प्रकल्पाचे काम थांबवा; महापालिका पर्यावरण विभागाचे ठेकेदाराला आदेश

मिशन संजीवनी योजना आणणार

आयुष्यमान भारत योजनेशिवाय मिशन संजीवनी योजना शासन आणणार आहे. यामध्य लिव्हर ट्रान्सप्लांट यावरती उपचार होणार आहेत. यामध्ये शंभर ट्रान्सप्लांट खाजगी रुग्णालयांना देऊन नागरिकांवर उपचार केले जाणार आहेत.

बैठकीला दांडी मारणाऱ्या रुग्णालयाला दणका

हॉस्पिटलला नियमात बसवण्यात हयगय केली जाणार नाही. नियमात कसूर केल्यावर शिक्षा काय असते ते आम्ही आज दाखवलेल आहे. एका हॉस्पिटलला आज आम्ही बैठकीला बोलवलं होतं ते आले नाहीत त्यामुळे त्यांचे या योजनेचे जवळपास सत्तावीस कोटी रुपये आम्ही थांबवले आहेत, असंही शेटे यांनी स्पष्ट केले.

Pune news
Pimpari Chinchwad: पीएमआरडीएची मेट्रो ’स्लो’; स्थानकांची कामे अपूर्णच; प्रशासनाचा ढिसाळ कारभार

पीडितांनी आवाज उठवणे गरजेचे

तनिषा भिसे मंगेशकर हॉस्पिटल मृत्यू प्रकरणात जे पीडित आहेत त्यांनी आवाज उठवला पाहिजे. आपण प्रकरण ताजे असेपर्यंत पाठपुरावा करतो मात्र या प्रकरणात सगळ्यात जास्त पीडित आहेत ते कुटुंबीय आहेत. त्यांनी आता आवाज उठवला पाहिजे, असं डॉ. शेटे यांनी व्यक्त केले.

नागरिकांना तक्रार कुठे करता येईल?

टोल फ्री १८००२३३२२०९ नंबर हा आयुष्यमान भारत योजनेचा नंबर असून नागरिकांनी यावर आपली तक्रार करावी, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news