Samagra Progress Report: ‘समग्र प्रगतिपुस्तिका’ची राज्यस्तरावर झाडाझडती; अधिकाऱ्यांना १५ शाळांची तपासणी बंधनकारक

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या नोंदींची होणार पडताळणी; २० सप्टेंबरपर्यंत जिल्हानिहाय अहवाल सादर करण्याचे निर्देश
Samagra Progress Report
Samagra Progress ReportPudhari
Published on
Updated on

पुणे: विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केवळ परीक्षेतील गुणांपुरते मर्यादित न ठेवता त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, भावनिक, कलात्मक, क्रीडा आणि जीवनकौशल्यांच्या सर्वांगीण विकासाचा आढावा घेण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या 'समग्र प्रगतिपुस्तिका' उपक्रमाच्या अंमलबजावणीची आता राज्यस्तरावरून झाडाझडती घेतली जाणार आहे.

Samagra Progress Report
Pune Loudspeaker Controversy: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ परवानगीवरून वाद; पोलिसांच्या निर्णयावर पुणेकर मंचाचा आक्षेप

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद अर्थात विद्या प्राधिकरणाने जिल्ह्यातील संबंधित अधिकाऱ्यांना किमान १५ शाळांना प्रत्यक्ष भेट देऊन 'समग्र प्रगतिपुस्तिका'च्या वापराची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. या पाहणीचा जिल्हानिहाय संक्षिप्त अहवाल २० सप्टेंबर २०२६ पर्यंत सादर करावा लागणार आहे.

Samagra Progress Report
Pune Adulterated Paneer: पुण्यात भेसळयुक्त पनीर-खव्यावर एफडीएचा छापा; ४ ट्रक माल जप्त

राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र परख एनसीईआरटी यांच्या माध्यमातून केंद्र शासनाने सन २०२४-२५ पासून विद्यार्थ्यांना समग्र प्रगतिपुस्तिका उपलब्ध करून देण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यानुसार स्टार्स प्रकल्पांतर्गत राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून 'समग्र प्रगतिपुस्तिका'च्या वापराची अंमलबजावणी करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मूल्यमापन करताना केवळ पाठ्यपुस्तकातील ज्ञान किंवा परीक्षेतील गुणांकडे न पाहता त्याच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंचा विचार केला जातो.

Samagra Progress Report
Pune Crime: पुण्यात ६०० रुपयांवरून मित्राचा मित्रानेच केला खून; चाकू छातीत भोसकले

त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा सर्वंकष आणि सातत्यपूर्ण आढावा घेण्याची जबाबदारी शिक्षकांवर सोपविण्यात आली आहे. समग्र प्रगतिपुस्तिकेमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासंदर्भातील निरीक्षण नोंदी, मूल्यमापन नोंदी आणि शिक्षकांचे अभिप्राय नियमितपणे नोंदवले जातात का? याची अधिकाऱ्यांकडून तपासणी केली जाणार आहे. तसेच, या नोंदींचा वापर अध्यापन नियोजन, विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा आणि आवश्यक शैक्षणिक हस्तक्षेपासाठी केला जातो का? हेही पाहिले जाणार आहे. याशिवाय शिक्षकांमध्ये क्षमताआधारित मूल्यमापनाची समज विकसित झाली आहे का? याचाही आढावा घेण्यात येणार आहे.

Samagra Progress Report
Pune Ganesh Visarjan: गणेश विसर्जनासाठी पुणे महापालिका सज्ज; १५ घाटांवर २४ तास सुरक्षा

'गुणां'ऐवजी 'गुणवत्तापूर्ण विकासा'कडे लक्ष

समग्र प्रगतिपुस्तिकेमुळे विद्यार्थ्यांच्या केवळ शैक्षणिक कामगिरीऐवजी त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाचे मूल्यांकन करण्याची दिशा शिक्षणव्यवस्थेला मिळाली आहे. मात्र, या पुस्तिकेतील नोंदी केवळ कागदोपत्री न राहता त्यांचा प्रत्यक्ष अध्यापन प्रक्रियेत वापर होतो आहे का? याची खातरजमा करण्यासाठी ही पाहणी महत्त्वाची ठरणार आहे.

समग्र प्रगतिपुस्तिका ही केवळ विद्यार्थ्यांच्या गुणांची नोंद ठेवणारी पुस्तिका नसून, त्यांच्या सर्वांगीण विकासाचा आरसा आहे. त्यामुळे तिच्यातील नोंदी नियमित, अचूक आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी उपयोगी पद्धतीने केल्या जात आहेत का? याची प्रत्यक्ष पडताळणी आवश्यक आहे.

डॉ. कमलादेवी आवटे, सहसंचालक, विद्या प्राधिकरण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news