पुणे: शेळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र १० दिवसांपासून अंधारात, रुग्णांची गैरसोय, अधिकार्‍यांचे दुर्लक्ष

पुणे: शेळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र १० दिवसांपासून अंधारात, रुग्णांची गैरसोय, अधिकार्‍यांचे दुर्लक्ष
Published on
Updated on

शेळगाव (पुणे), पुढारी वृत्तसेवा: शेळगाव (ता. इंदापूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा वीजपुरवठा थकीत बिलापोटी तोडल्यामुळे मागील १० दिवसांपासून आरोग्य केंद्र अंधारात आहे. यामुळे रुग्णाची गैरसोय होत आहे. आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

शेळगावच्या आरोग्य केंद्राचे ३० हजारांहून अधिक रक्कमेचे वीज बिल थकीत आहे. ते न भरल्याने महावितरणने ३१ मार्च रोजी आरोग्य केंद्राचा वीजपुरवठा खंडित केला. यामुळे मागील १० दिवसांपासून सदरचे आरोग्य केंद्र अंधारात आहे. याचा परिणाम दैनंदिन कामकाजावर व रुग्ण सेवांवर झाला आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांनी वीज बिल न भरल्याबाबत चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी तसेच कर्मचारी कामाच्या वेळेत आरोग्य केंद्रात उपस्थित राहतात का याची चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

रुग्ण कल्याण समितीअंतर्गत निधी उपलब्ध नसल्यामुळे सदरचे बिल भरण्यास अडचण निर्माण झाली आहे. लवकरच यावर मार्ग काढून आरोग्य केंद्राचा वीजपुरवठा सुरळीत केला जाईल. कर्मचारी व आरोग्य अधिकारी यांचे वेळापत्रक तयार करून दिवसरात्र आरोग्य केंद्र सेवेसाठी सुरू राहील.
– डॉ. सुरेखा पोळ, तालुका आरोग्य अधिकारी.

संरक्षण भिंतीचे काम अपूर्ण

शेळगाव आरोग्य केंद्रात अद्ययावत यंत्रसामग्री आहे. परंतु, आरोग्य केंद्राचे संरक्षक भिंतीचे काम अपूर्ण आहे. ते लवकर पूर्ण करावे तसेच आरोग्य केंद्राच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरा बसवावा, अशी मागणी शेळगाव ग्रामस्थांनी केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news