Nira Valley Water Release: निरा खोऱ्यातील शेतकऱ्यांना दिलासा; वीर धरणातून दोन्ही कालव्यांना पूर्ण क्षमतेने पाणी

निरा देवघर, भाटघर आणि गुंजवणी धरणांतील पाण्याचे नियोजन; चारही धरणांत ८३ टक्के पाणीसाठा
Nira River
Nira RiverPudhari
Published on: 
Updated on: 

परिंचे: निरा खोऱ्यातील धरणसाखळीतून वीर धरणात पाणी सोडण्यात येत असल्याने तसेच निरा उजवा आणि डावा कालव्यातून पूर्णक्षमतेने विसर्ग सुरू झाल्याने दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. निरा देवघर, भाटघर आणि गुंजवणी या धरणांतील उपलब्ध पाण्याचे नियोजन करून वीर धरणात पाणी सोडले जात आहे. त्यामुळे शेतीचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागला आहे.

Nira River
Sarani Dam Water Theft: सारणी बंधाऱ्यातील पाण्यावर डल्ला? वीजपंपांद्वारे अनिर्बंध उपशाचा ग्रामस्थांचा आरोप

यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने निरा खोऱ्यातील अनेक भागांमध्ये पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. विहिरी, तलाव, ओढे आणि लहान बंधाऱ्यांमधील पाणीसाठा कमी झाल्याने शेतीच्या पाण्याचे नियोजन करणे कठीण झाले होते. अशा परिस्थितीत निरा खोऱ्यातील धरणांमधून वीर धरणात पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने पाणी व्यवस्थापनाला गती मिळाली आहे.

Nira River
DP Road Land Acquisition: मुंढव्यातील बी. टी. कवडे रोड ते भीमनगर रस्त्याचा मार्ग मोकळा; २६ मिळकतधारकांना नोटिसा

वीर धरण हे निरा उजवा आणि डावा कालवा सिंचनव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याने या धरणातील पाणीसाठ्याचे नियोजन संपूर्ण लाभक्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. निरा उजवा 1550 आणि निरा डावा कालव्यातून 827 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. उपलब्ध पाण्याचा फायदा रब्बी हंगामातील पिकांसह चारापिकांना होणार आहे.

Nira River
Pune Bhide Bridge Traffic Diversion: पुण्यातील भिडे पूल वाहतुकीसाठी बंद; मेट्रोच्या पादचारी केबल पुलाच्या कामामुळे वाहतूक वळवली

सद्य:स्थितीत भाटघर धरणात 93, निरा देवघर धरणात 94, वीर धरणात 65, गुंजवणी धरणात 90 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. चारही धरणांत मिळून 83 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्याचे नियोजन करून सोडण्यात आलेल्या आवर्तनामुळे शेती व पिण्याचे पाणी, रब्बी हंगामीतील पिके, चारापिकांचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

पाण्याचे नियोजन आवश्यक

धरणांमध्ये उपलब्ध असलेला पाणीसाठा मर्यादित असल्याने त्याचा वापर काटकसरीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने होणे गरजेचे आहे. कालव्याच्या सुरुवातीच्या भागातील शेतकऱ्यांबरोबरच शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांनाही समान न्यायाने पाणी मिळणे आवश्यक आहे, असे पंचायत समितीचे उपसभापती प्रवीण जगताप यांनी सांगितले.

Nira River
Pune Court Employees Strike: न्यायालयात कर्मचारीच गायब! न्यायाधीशांनी स्वतः हाताने लिहिला आरोपीच्या कोठडीचा आदेश

शेतकऱ्यांच्या पाण्याची गरज आणि धरणाच्या पाण्याची पातळी, याचा सारासार विचार करून वरिष्ठांच्या सूचनेनुसार योग्य वेळी पाण्याच्या विसर्गात कमी-जास्त प्रमाणात बदल होऊ शकतो.

राहुल मिसाळ, शाखा अभियंता

कालव्यांद्वारे सिंचनासाठी पाणी सोडल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मात्र, केवळ पाणी सोडून चालणार नाही, तर ते नियोजनानुसार प्रत्येक गावात पोहचणे आवश्यक आहे.

संतोष धुमाळ, माजी अध्यक्ष, वीर देवस्थान

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.