Sarani Dam Water Theft: सारणी बंधाऱ्यातील पाण्यावर डल्ला? वीजपंपांद्वारे अनिर्बंध उपशाचा ग्रामस्थांचा आरोप

चिव्हेवाडी, देवडीसह परिसरातील गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर; कथित पाणीचोरी रोखण्याची ग्रामस्थांची मागणी
Sarani Dam
Sarani DamPudhari
Published on: 
Updated on: 

सासवड: पुरंदर तालुक्यातील चिव्हेवाडी-सारणी बंधारा परिसरात पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यातच बंधाऱ्यातील पाण्याचा वीजपंपांच्या माध्यमातून अनिर्बंध उपसा होत असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

Sarani Dam
DP Road Land Acquisition: मुंढव्यातील बी. टी. कवडे रोड ते भीमनगर रस्त्याचा मार्ग मोकळा; २६ मिळकतधारकांना नोटिसा

उपलब्ध पाणीसाठ्याची काही जणांकडून लूट होत असल्याची तक्रार असून, प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करून कथित पाणीचोरी रोखावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. चिव्हेवाडी आणि देवडी या गावांसह परिसरातील वाड्या-वस्त्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रमुख आधार सारणी बंधाऱ्यातील पाणीसाठा आहे.

Sarani Dam
Pune Bhide Bridge Traffic Diversion: पुण्यातील भिडे पूल वाहतुकीसाठी बंद; मेट्रोच्या पादचारी केबल पुलाच्या कामामुळे वाहतूक वळवली

त्यामुळे या साठ्यात घट झाल्यास नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर पाण्याची मागणी आणखी वाढणार असल्याने उपलब्ध साठ्याचे आतापासूनच काटेकोर नियोजन करणे आवश्यक आहे.

Sarani Dam
Pune Court Employees Strike: न्यायालयात कर्मचारीच गायब! न्यायाधीशांनी स्वतः हाताने लिहिला आरोपीच्या कोठडीचा आदेश

वीजपंपांद्वारे अनिर्बंध उपसा?

बंधारा परिसरात काही ठिकाणी मोठ्या क्षमतेचे वीजपंप बसवून मोठ्या प्रमाणावर पाणी उपसा केला जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या उपशावर नियंत्रण नसल्यास बंधाऱ्यातील उपलब्ध पाणीसाठा वेगाने कमी होण्याची शक्यता आहे. परिणामी, गावांचा नियोजित पाणीपुरवठा विस्कळीत होऊन आगामी काळात पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागू शकते.

Sarani Dam
Pune Open Mic Events: पुण्यात ‘ओपन माईक’चा ट्रेंड जोरात; तरुणाईला मिळतेय हक्काचे व्यासपीठ!

कारवाईकडे लक्ष

प्रशासनाने केवळ पाणीवाटपाचे नियोजन न करता बंधारा परिसरातील प्रत्यक्ष पाणीउपशाची तपासणी करावी. उपलब्ध पाणीसाठा गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी सुरक्षित ठेवून अनधिकृत उपशावर नियंत्रण आणावे. अन्यथा आगामी उन्हाळ्यात चिव्हेवाडी, देवडीसह परिसरातील वाड्या-वस्त्यांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे प्रशासन आता नेमकी कोणती भूमिका घेते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.