

निमोणे: ग््राामीण भागातील बहुतांशी प्राथमिक व माध्यमिक शाळाना ग््राामपंचायत वित्तीय फंडातून किंवा लोकवर्गणीतून शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही बसवले आहेत. मात्र, बहुतांशी शाळेतील सीसीटीव्ही एकतर कायम बंद असतात किंवा सायंकाळी पाचनंतर बंद केले जातात, अशी धक्कादायक माहित एका पाहणी अहवालात उघड झाली आहे.
शिरूर तालुक्यातील ग््राामीण भागातील प्राथमिक शाळा व भाग शाळा या मोठ्या प्रमाणात शेतात किंवा शेताजवळ आहेत. बिबटप्रवण क्षेत्र म्हणून हा परिसर ओळखला जातो. शाळा परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी स्थानिक नागरिक मुलांच्या सुरक्षेसाठी पदरमोड करून सीसीटीव्ही बसवतात. तेच सीसीटीव्ही अनेक शाळांमध्ये काही महिन्यांपासून बंद असल्याचे धक्कादायक महिती पुढे आली आहे.
भाग शाळांमध्ये दोन शिक्षकांवरच ज्ञानदानाचा सर्व डोलारा उभा असतो. शाळेच्या कामकाजात लुडबुड नको अशी धारणा स्थानिक ग््राामस्थांची असते. त्यातून ग््राामस्थ आणि पालक शाळेतील कारभाराकडे दुर्लक्ष करतात. मात्र, मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि शिक्षकांवरील असलेल्या विश्वासातून गावोगावी सीसीटीव्ही बसवले गेलेत. ते सुरू ठेवण्याची नैतिक जबाबदारी शाळेसह शिक्षकांची आहे. मात्र, ते सीसीटीव्ही अनेक काळ बंद राहिल्याने ग््राामस्थांतून संशय व्यक्त केला जातोय.
उडवाउडवी उत्तरे
सीसीटीव्ही का बंद आहे अशी विचारणा केल्यानंतर शिक्षकांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचेही नागरिकांनी सांगितले. वायर उंदरांनी कुरतडली असेल, तो खूप उंच बसवला आहे. हात पुरत नाही, आमच्या ते लक्षातच आले नाही, या पद्धतीची उत्तर मिळत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिक ग््राामसेवकांना शाळांना भेट देण्यास सांगणार आहे. ज्या ठिकाणी सीसीटीव्ही बंद आढळतील ते चालू करून घेतले जातील.
महेश डोके, गटविकास अधिकारी