Khadakwasla Dam Water Stock: खडकवासला धरणसाखळीत समाधानकारक पाणीसाठा; रब्बी आवर्तन सुरू

गतवर्षीपेक्षा जवळपास १ टीएमसी अधिक पाणी, पुणे जिल्ह्यात शेती व पिण्यासाठी नियोजनबद्ध पुरवठा
Khadakwasla Dam
Khadakwasla DamPudhari
Published on
Updated on

वेल्हे: पुणे शहर व जिल्ह्यातील एक कोटी नागरिकांची तसेच 66 हजार हेक्टर शेतीची तहान भागविणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत गतवर्षापेक्षा अधिक साठा आहे. धरणसाखळीत शनिवारी (दि. 27) दिवसअखेर 23.96 टीएमसी म्हणजे 82.17 टक्के साठा आहे.

Khadakwasla Dam
Baramati Extortion Attack: हप्ता न दिल्याने चायनीज हॉटेलचालकावर कोयत्याने हल्ला; बारामतीत खळबळ

सध्या खडकवासलातून हवेली, दौंड, इंदापूरसह जिल्ह्यातील शेतीला रब्बी आवर्तनाचे पाणी सोडले जात आहे. हे आवर्तन 1 फेबुवारीपर्यंत सुरू राहणार आहे.

Khadakwasla Dam
Papaya Farming Success: सव्वा एकरात पपईतून १० लाखांचे उत्पन्न; आंबळेतील जयेश दरेकरांचा कृषी आदर्श

खडकवासला धरण विभागाचे उपविभागीय अभियंता मोहन भदाणे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या मागणीनुसार 9 डिसेंबर रोजी शेतीला रब्बी आवर्तनाचे पाणी सुरू करण्यात आले आहे. तेव्हापासून शुक्रवारपर्यंत (दि. 26) 1.39 टीएमसी पाणी शेतीला सोडले आहे. सध्या खडकवासलातून मुठा कालव्यात 1 हजार 54 क्सुसेक वेगाने शेतीसाठी पाणी सोडले जात आहे.

Khadakwasla Dam
Shirur NCP Politics: शिरूर तालुक्यात राष्ट्रवादी एकत्र नकोच; मनोमिलन फिस्कटताच कार्यकर्त्यांचा सुटकेचा नि:श्वास

यंदा एक टीएमसी अधिक पाणी

गेल्या वर्षी आजच्या दिवशी 27 डिसेंबर 2024 रोजी खडकवासला धरणसाखळीत 23 टीएमसी म्हणजे 78.90 टक्के साठा होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरणसाखळीत जवळपास एक टीएमसी अधिक पाणी आहे. सध्या पानशेत 84.33, वरसगाव 85.86, तर टेमघरमध्ये 80.03 टक्के साठा आहे. शेती व पिण्यासाठी पूर्णक्षमतेने पाणी सोडले जात असल्याने तिन्ही धरणांतील पाणीपातळी खाली जात आहे.

Khadakwasla Dam
Katewadi Plastic Ban: काटेवाडीत प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी; ग्रामपंचायतीची दंडात्मक कारवाई

शेतीला पाण्यासह पुणे शहर व परिसरासाठी पाणी सोडले जात आहे. त्यामुळे खडकवासला धरणात वरील तिन्ही धरणांतून पाणी सोडण्यात येत आहे. पानशेत व वरसगावमधून प्रत्येकी 600 व टेमघर 300 क्युसेकने पाणी सोडले जात आहे. खडकवासलाची पाणीपातळी 50 टक्क्यांवर कायम असल्याने शेती व पिण्यासाठी नियोजनबद्ध पाणीपुरवठा होत आहे.

गिरिजा कल्याणकर-फुटाणे, शाखा अभियंता, खडकवासला धरण विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news