निओ मेट्रोचा प्रस्ताव लांबणीवर

निओ मेट्रोचा प्रस्ताव लांबणीवर
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  बहुचर्चित 'एचसीएमटीआर' या मार्गावरील प्रस्तावित निओ मेट्रोचा प्रस्ताव लांबण्याची शक्यता असून, नाशिक येथे निओ मेट्रोच्या प्रकल्पास केंद्राने मंजुरी दिल्यानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी महापालिकेने एचसीएमटीआर प्रकल्पाचे नियोजन केले होते. मात्र, 'एचसीएमटीआर'च्या नियोजित मार्गावरच पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराला जोडणार्‍या निओ मेट्रो करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फणवीस यांनी केल्या होत्या. त्यानुसार महामेट्रोकडून निओ मेट्रोचा प्रकल्प आराखडा तयार केला आहे.

या विषयावर मुंबई येथे झालेल्या 'वॉर रूम' बैठकीत चर्चा झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. याविषयी माहिती देताना महापालिका आयुक्त विक्रम कुमार म्हणाले, मेट्रो मार्ग उभारण्यासाठी प्रति किलोमीटर अडीचशे कोटी रुपये इतका खर्च येतो. तुलनेत निओ मेट्रोसाठी प्रति किलोमीटरला शंभर कोटी रुपये इतका खर्च येतो. यामुळे कमी खर्चात जास्त प्रवासी वाहतूक करणारी व्यवस्था निओ मेट्रोच्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकते. याबाबत गेल्या दोन वर्षांपासून चर्चा सुरू आहे. तसेच निओ मेट्रो अद्याप देशात कोठेही सुरू झाली नाही.

नाशिक शहरात निओ मेट्रो सुरू करावी, असा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला गेला आहे. परंतु अद्याप केंद्र सरकारकडून नाशिकच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली नाही, ती मिळाल्यानंतरच पुण्यातील निओ मेट्रोचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

मेट्रो फिडर बससेवेसाठी तीनशे बस घेणार
मेट्रो प्रवाशांसाठी फिडर बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार 7 मीटर लांबीच्या 300 ई बस भाडेतत्त्वावर घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे मेट्रोने प्रवास करणार्‍यांना फिडर बससेवा उपलब्ध होऊन खासगी वाहनांचा वापर कमी होण्यास मदत होईल. मेट्रोच्या तिकिटातच या फिडर बसमधून प्रवास करता येणार आहे. याचा महसुलाचा वाटा निश्चित केला जाणार आहे. ही फिडर बससेवा मेट्रो स्थानकच्या तीन ते चार किलोमीटर परिघात उपलब्ध होईल.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news