NEET paper leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातील बॉटनी शिक्षिकेला CBIकडून अटक

NTA 'तज्ज्ञ' असल्‍याने मिळाली होती बॉटनी आणि झूलॉजीच्या प्रश्नपत्रिका पाहण्याची परवानगी
NEET paper leak Case
Published on
Updated on

NEET paper leak Case

नवी दिल्ली: NEET-UG 2026 पेपर लीक प्रकरणी पुण्‍यातील बॉटनीच्‍या (वनस्‍पतीशास्‍त्र) शिक्षिका मनीषा गुरुनाथ मांढरे यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI)अटक केली आहे.वैद्यकीय प्रवेश परीक्षेत लीक झालेल्या बायोलॉजीच्या (जीवशास्त्र) प्रश्नांचा स्त्रोत हीच शिक्षिका असल्याचे सीबीआयने स्पष्ट केले आहे.

मनीषा मांधरे NTA 'तज्ज्ञ'

'एएनआय'ने दिलेल्‍या वृत्तानुसार, मनीषा मांढरे या NEET-UG 2026 च्या परीक्षा प्रक्रियेत सहभागी होत्‍या. राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (NTA) त्यांची 'तज्ज्ञ' म्हणून नियुक्ती केली होती. यामुळे त्यांना बॉटनी आणि झूलॉजी (प्राणिशास्त्र) च्या प्रश्नपत्रिका पाहण्याची परवानगी मिळाली होती.

NEET paper leak Case
NEET UG paper leak case | 'नीट'पेपरफुटी प्रकरणी सीबीआयची मोठी कारवाई, पाच आरोपींना अटकेत अनेक ठिकाणी छापेमारी

बॉटनी आणि झूलॉजीचे अनेक प्रश्न आधीच उघड केल्‍याचा आरोप

सीबीआयने स्‍पष्‍ट केले आहे की, एप्रिल २०२६ दरम्यान त्यांनी मनीषा मांढरे यांच्‍या माध्यमातून NEET परीक्षेला बसणाऱ्या संभाव्य विद्यार्थ्यांशी संपर्क साधला होता. त्‍यांनी त्यांच्या पुण्याच्या निवासस्थानी विद्यार्थ्यांसाठी विशेष कोचिंग क्लासेस घेतले होते. या क्लासेसदरम्यान त्यांनी बॉटनी (वनस्‍पतीशास्‍त्र) आणि झूलॉजी (प्राणीशास्‍त्र)चे अनेक प्रश्न आधीच उघड केले. हे प्रश्‍न विद्यार्थ्यांना त्यांच्या वह्यांमध्ये व पाठ्यपुस्तकात नोंदवून घेण्यास सांगितले होते. त्यांनी दिलेले बहुतांश प्रश्न ३ मे रोजी घेतलेल्या (आणि आता रद्द झालेल्या) मुख्य NEET-UG 2026 च्या प्रश्नपत्रिकेशी तंतोतंत जुळणारे होते.

NEET paper leak Case
NEET Paper leak: नीटचा पेपर फुटलाय हे सर्वात आधी कोणाला कळालं... पोलिसांनी FIR का दाखल केली नाही, ३ मे रोजी नेमकं काय झालं?

प्रश्नपत्रिका तयार करण्यात सहभाग असलेल्यांची चौकशी

नीट पेपरफुटीप्रकरणी यापूर्वी लातूरमधून रसायनशास्त्राचे (Chemistry) निवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी यांना सीबीआयने अटक केली होती. शैक्षणिक क्षेत्रात तीन दशकांहून अधिक काळ घालवलेले कुलकर्णी, प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या एनटीएच्या (NTA) पॅनेलचा भाग होत. प्रश्नपत्रिका तयार करण्यात सहभाग असलेल्या इतर व्यक्तींच्या भूमिकेचीही तपासकर्ते कसून चौकशी करत आहेत.

NEET paper leak Case
NEET Paper Leak: डार्लिंग तुझ्यासाठी NEET चा पेपर मिळवला.. प्रोफेसर पुरता अडकला... लैंगिक सुखाच्या मागणीचा आरोप, झाली अटक

२४ तासांत सीबीआयचे देशभरात सहा ठिकाणी छापे

नीट पेपरफुटीप्रकरणी गेल्या २४ तासांत सीबीआयने देशभरात सहा ठिकाणी छापे टाकले असून अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे, लॅपटॉप, बँक स्टेटमेंट आणि मोबाईल फोन जप्त केले आहेत. जप्त केलेल्या साहित्याचे सविस्तर विश्लेषण सुरू असल्याचे सीबीआयने स्‍पष्‍ट केले आहे. आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर येथून नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे. पाच आरोपींना आधीच चौकशीसाठी सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, पुण्यात अटक करण्यात आलेल्या इतर दोन आरोपींना स्थानिक न्यायालयात हजर केले असता, त्यांना ट्रान्झिट रिमांडवर दिल्लीला हलवण्यात आले आहे.

NEET paper leak Case
NEET Paper Leak: फक्त NEETचं का? JEE Mainचे पेपर का फुटत नाहीत? परीक्षेत कुठे होतोय घोळ? जाणून घ्या A to Z माहिती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news