NEET Paper Leak: डार्लिंग तुझ्यासाठी NEET चा पेपर मिळवला.. प्रोफेसर पुरता अडकला... लैंगिक सुखाच्या मागणीचा आरोप, झाली अटक

NEET Paper Leak
NEET Paper Leakpudhari
Published on
Updated on

NEET Paper Leak Audio Clip Controversy: नीट पेपर फुटीचा विषय देशभरात तापला असतानाच लखनौमधील एक मोठं प्रकरण समोर आलं आहे.  लखनौ विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागातील सहाय्यक प्रोफेसर परमजीत सिंह यांना एका व्हायरल ऑडिओ क्लिपवरून अटक झाली आहे. या कथित क्लिपमध्ये प्रोफेसर महिला विद्यार्थिनीला लीक झालेला नीटचा पेपर ऑफर करतो आणि त्या बदल्यात लैंगिक सुखाची मागणी केल्याचा आरोप होत आहे. 

NEET Paper Leak
NEET Paper leak: नीटचा पेपर फुटलाय हे सर्वात आधी कोणाला कळालं... पोलिसांनी FIR का दाखल केली नाही, ३ मे रोजी नेमकं काय झालं?

मिळालेल्या माहितीनुसार महिला विद्यार्थिनीने या प्रकारामुळं मानसिक ताण आल्याची तक्रार विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानंतर हसनगंज पोलीस ठाण्यात या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली. 

NEET Paper Leak
NEET UG paper leak case | 'नीट'पेपरफुटी प्रकरणी सीबीआयची मोठी कारवाई, पाच आरोपींना अटकेत अनेक ठिकाणी छापेमारी

दरम्यान, आरोपीने आल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. प्रोफेसरने दावा केला आहे की त्याला अंतर्गत राजकारणामुळं या प्रकरणात अडकवण्यात येत आहे. विद्यापीठाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. विद्यापीठाने या प्रकरणी झिरो टॉलरन्स धोरण असल्याचं सांगितलं. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आंदोलन करत कडक कारवाईची मागणी केली आहे. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news