Maharashtra Mental Health Institute: येरवडा, ठाणे, नागपूर मनोरुग्णालयांना मिळणार नवी ओळख! अध्यापन संस्था सुरू करण्याचा शासनाचा निर्णय

मानसिक आरोग्य सेवेत मोठा बदल; तज्ज्ञांची कमतरता दूर करण्यासाठी राज्यातील चार रुग्णालयांत शिक्षण व संशोधन केंद्रांची स्थापना करण्याचा मानस
Online Education
Online EducationPudhari
Published on
Updated on

पुणे: राज्यातील चार प्रादेशिक मनोरुग्णालयांमध्ये पूर्णवेळ अध्यापन संस्था सुरू करण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. मानसिक आरोग्य सेवा अधिक सक्षम करणे, संशोधनाला चालना देणे आणि प्रशिक्षित मानसिक आरोग्यतज्ज्ञांची कमतरता दूर करणे, हा या मोठ्या निर्णयामागील उद्देश आहे.

Online Education
Pune School Stationery Price Hike: “शालेय साहित्याचा महागाईचा झटका!” पुण्यात 25-30% दरवाढीने पालक हवालदिल

प्रस्तावित योजनेअंतर्गत येरवडा, ठाणे, रत्नागिरी आणि नागपूर येथील प्रादेशिक मानसिक रुग्णालयांचा समावेश करण्यात आला आहे. या चारही रुग्णालयांमध्ये सध्या बाह्यरुग्ण आणि निवासी मानसिक आरोग्यसेवा दिल्या जातात. एकूण या रुग्णालयांमध्ये सुमारे 5,700 खाटांची सुविधा उपलब्ध आहे.

Online Education
FYJC Admission 2026: अकरावी प्रवेशाची पहिली ॲलॉटमेंट 29 मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर

येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालय 138 एकर परिसरात वसलेले आहे. 1915 मध्ये सुरू झालेल्या या रुग्णालयात 2,540 रुग्णांची निवासी क्षमता असून, सध्या येथे 921 रुग्ण दाखल आहेत. रुग्णालयात आंतररुग्ण आणि बाह्यरुग्ण विभागाची सुविधा आहे. पुणे, सोलापूर, सातारा, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांसाठी हे रुग्णालय तृतीय स्तरीय मानसिक आरोग्यसेवा पुरविते.

येरवडा मनोरुग्णालयामध्ये ‌‘डिप्लोमा इन सायकियाट्रिक नर्सिंग‌’ला मान्यता दिली आहे. एमबीबीएस आणि एमडी हे अभ्यासक्रम सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने चालविले जाणार आहेत. इतर अभ्यासक्रमांसाठी यूजीसीकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

डॉ. श्रीनिवास कोलाड, वैद्यकीय अधीक्षक, येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news