NDA Women Cadets Officers: एनडीएमधून 53 मुली गेल्या सैन्यदलात अधिकारी पदावर; कॅडेट श्रीती दक्षने मिळवले राष्ट्रपतींचे पहिले सुवर्ण

सिद्धी जैनने मिळले पहिले रजतपदक
NDA Women Cadets Officers
NDA Women Cadets OfficersPudhari
Published on
Updated on

पुणे: राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीएमधून मे 2025 ते मे 2026 या एक वर्षाच्या कालावधीत 53 मुलींना सैन्यदलात अधिकारी पदावर जाण्याचा मान मिळाला आहे. एका वर्षात मुलींच्या तीन तुकड्या सैन्यदलाच्या तिनही शाखांमध्ये दाखल झाल्या. कॅडेट श्रीती दक्ष हिने राष्ट्रपतींचे पहिले सुवर्ण पदक तर सिद्धी जैन हिने पहिले रजतपदक जिंकण्याचा मान मिळवला.

एनडीएची स्थापना होऊन 75 वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला. मात्र, या ठिकाणी फक्त मुलांनाच प्रवेश होता. सन 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने मुलींना येथे प्रवेश सुरू झाला. त्यामुळे एनडीएची प्रवेश चाचणी होवून 2022 मध्ये 17 मुलींना प्रवेश मिळाला.

NDA Women Cadets Officers
Vikram Kakade Victory Statement: बिनविरोध निवडून आल्यानंतर काकडेंची भावनिक प्रतिक्रिया; महायुतीसह शरद पवार यांनाही दिले विजयाचे श्रेय

30 मे 2025 रोजी 17 मुलींची ऐतिहासिक बॅच अधिकारी म्हणून दीक्षान्त समारंभ पार पडला. त्यावेळी मुलींचा प्रचंड जल्लोष पाहण्यासाठी देशभरातील प्रसार माध्यमे पुण्यातील खडकवसाला भागातील एनडीएच्या खेत्रपाल मैदानावर गर्दी करून उपस्थित झाले होते.

हा ऐतिहासिक क्षण प्रत्येकाने कॅमेरात टिपला. मुलांच्या खांद्याला खांदा लावत 17 मुलींनी 148 व्या दीक्षान्त संचलनात सहभाग नोंदवला. नोव्हेंबर 2025 मध्ये 149 वा दीक्षान्त समारंभातून 18 मुली अधिकारी म्हणून सैन्यदलात गेल्या. तर 30 मे 2026 रोजी 150 व्या दीक्षान्त समारंभातून पुन्हा 18 मुली अधिकारी पदावर निवडल्या गेल्या.

NDA Women Cadets Officers
MVA Internal Dispute: राष्ट्रवादीच्या माघारीवर काँग्रेसचा संताप;‌ ‘हा विश्वासघात, आता स्वबळाचा विचार‌’

मुलींनी घेतले हे खडतर प्रशिक्षण

लष्करी प्रशिक्षण, शारीरिक क्षमता, अडथळा शर्यंत, शस्त्र प्रशिक्षण, नेतृत्व विकास, मैदानी सराव, पोहणे घोडेस्वारी, ड्रील, शैक्षणिक पदवी ः बीए, बीएस्सी, बी.टेक.

नोव्हेंबर 2025 मध्ये मिळाले पहिले सुवर्ण

मे 2025 नंतर नोव्हेंबर 2025 मध्ये मुलींची दुसरी बॅच सैन्यदलात अधिकारी पदावर दाखल झाली. आजवर मुलांची मक्तेदारी राष्ट्रपतींच्या सुवर्ण पदकावर होती. एनडीएच्या इतिहासात प्रथमच श्रीती दक्ष या महिला कॅडेटने राष्ट्रपतींचे सुवर्ण पदक तर सिद्धी जैन हिने पहिले रजत पदक मिळवले. त्यावेळी सर्वांच्या अंगावर रोमांच उभे राहिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news