जेजुरीत ‘येळकोट येळकोट’ जय मल्हार

जेजुरीत ‘येळकोट येळकोट’ जय मल्हार
Published on
Updated on

जेजुरी : पुढारी वृत्तसेवा :  महाराष्ट्राचे कुलदैवत व बहुजन समाजाचा लोकदेव असणार्‍या जेजुरीच्या श्रीखंडोबा देवाच्या चंपाषष्ठी उत्सवाची सोमवारी (दि. 18) धार्मिक वातावरणात वांग्याचे भरीत-रोडगा, पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून सांगता झाली. जय मल्हार चंपाषष्ठी अन्नछत्र प्रतिष्ठानच्या वतीने दोन हजार किलो वांग्याचे भरीत व रोडग्याचा महाप्रसाद भाविकांना देण्यात आला.

चंपाषष्ठी उत्सवाला मार्गशीर्ष प्रतिपदेला शंकराचार्य नृसिंह सरस्वती भारती यांच्या हस्ते घटस्थापना होऊन प्रारंभ झाला होता. या उत्सव काळात 'मार्तंडविजय ग्रंथा'चे पारायण, वाघ्या मुरुळी, लोक कलावंतांचा जागर, मल्हारी सहस्रनाम याग, होम हवन, देवदिवाळी, देवाला तेलवण करून हळद लावण्यात आली. सोमवारी पहाटे चंपाषष्ठी उत्सवाच्या सांगता कार्यक्रमानिमित्त देवाचे घट उठविण्यात आले. मानकरी व ग्रामस्थांच्या वतीने देवाला दुग्धाभिषेक महापूजा घालण्यात आली. या उत्सवाच्या निमित्ताने गेली सहा दिवस लाखोंच्या संख्येने भाविकांनी श्रीखंडोबा देवाचे दर्शन घेऊन कुलधर्म-कुलाचार केले. चंपाषष्ठी उत्सवाच्या शेवटच्या दिवशी एक लाख भाविकांनी श्रीखंडोबा देवाच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर गर्दी केली होती. जयमल्हार चंपाषष्ठी अन्नछत्र प्रतिष्ठानचे गणेश आगलावे, प्रशांत सातभाई, बापू सातभाई, अविनाश बारभाई, सतीश कदम, दिलीप आगलावे, पुजारी सेवकवर्ग, श्रीमार्तंड देव संस्थानचे विश्वस्त आदींनी या उत्सवाचे आयोजन केले.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news