

आळंदी : पुढारी वृत्तसेवा : पीठसाखर, लिंबु आणि गरम पाण्याची धार घालत माऊलींचा कार्तिकी वारीतील शिनवटा घालवण्यासाठी भाविकांनी माऊलीं मंदिरात गर्दी केली होती. मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीला परंपरेनुसार संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीवर सकाळी भाविकांच्या प्रशाळपूजा संपन्न झाल्य. त्यानंतर देवस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे हस्ते पवमान अभिषेकपूजा करण्यात आली. यावेळी विश्वस्त ऍड. राजेंद्र उमाप, डॉ. भावार्थ देखणे, प्रमुख व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर व इतर मान्यवर उपस्थित होते. तद्नंतर मानकऱ्यांना देवस्थानचे वतीने नारळ प्रसाद वाटप करण्यात आले.
संबंधित बातम्या :
संत ज्ञानेश्वर महाराजांचा यंदा संजीवन समाधी सोहळा झाला. हा सोहळा अमवास्येपर्यंत चालत असतो. त्यांनंतर सात दिवसांनी प्रशाळ पूजा पार पडत असते. यावेळी भाविक समाधीवर पाणी घालत माऊलींचा एक प्रकारे थकवा घालवत असतात यासाठी आवर्जून भाविक आळंदीत येत असतात. कार्तिकीत अनेक भाविकांना माऊलींच्या मुखदर्शनावर समादान मानावे लागते. प्रशाळ पूजेनिमित्ताने त्यांचे स्पर्शदर्शन झाल्याने एक प्रकारचे समादान भाविकांच्या नजरेत यावेळी दिसून येत होते.