Lakshmi Pujan 2026: नरक चतुर्दशी अन् लक्ष्मीपूजन एकाच दिवशी; दिवाळीचा आनंद द्विगुणित!

आज घराघरांत लक्ष्मी-कुबेर पूजनाचा उत्साह; सायंकाळी ५.५० ते रात्री १०.५० पूजेचा मुहूर्त, अभ्यंगस्नानासह प्रकाशोत्सवाची धूम
Lakshmi Pujan
Lakshmi PujanPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: रांगोळीच्या मनोहारी पायघड्या, दिवे-पणत्यांचा लख्ख प्रकाश, आकाश कंदिलाच्या प्रकाशाने उजळलेले घराचे प्रवेशद्वार, फुलांचे तोरण, सहकुटुंब एकत्र येऊन पूजा-अर्चा अन्‌ फटाक्यांची आतषबाजी... असे चैतन्यमयी वातावरण रविवारी (दि. ८) लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराघरांमध्ये रंगणार आहे. यंदा तिथींच्या संयोगामुळे नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन हे दोन्ही सण एकाच दिवशी आल्याने दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला आहे. पहाटे अभ्यंगस्नान आणि सायंकाळी लक्ष्मी-कुबेरपूजन, असा दुहेरी उत्साह अनुभवायला मिळणार आहे. नव्या उभारीने, उमेदीने, मांगल्याचे दीप प्रज्वलित करून मनोभावे लक्ष्मी आणि कुबेरपूजन करून दिवाळीचा आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे. सणाच्या निमित्ताने कुटुंब एकत्र आल्यामुळे प्रत्येकजण आनंदी आहे. लक्ष्मीपूजनासाठी सायंकाळी ५.५० ते रात्री १०.५० मुहूर्त आहे. शहरासह उपनगरांमध्ये दिवाळीच्या प्रकाशोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

Lakshmi Pujan
Maharashtra Migrant Nomadic Tribes Survey: महाराष्ट्रातील स्थलांतरित भटक्या-विमुक्त समाजाचे सर्वेक्षण होणार; शासनाकडून विशेष समिती स्थापन

नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन हे दिवाळीतील महत्त्वाचे दिवस आहेत. यंदा हे दोन्ही सण एकत्र आल्याने आनंद आणखी द्विगुणित झाला आहे. नरक चतुर्दशीला पहाटे अभंग स्नान करून दिवाळीच्या आनंदी सणाची सुरुवात होईल, तर दिवसभर लक्ष्मीपूजनाचा आनंद बहरणार आहे. फराळाचा दरवळ, रंगबीरंगी पताके, फुलांची सजावट, नक्षीदार रांगोळी, विद्युतरोषणाईचा प्रकाश... असे वातावरण दिवाळीच्या तेजोमयी पर्वानिमित्त पाहायला मिळत असून, पारंपरिक वेशभूषा परिधान केलेले कुटुंबीय सायंकाळी मुहूर्त साधून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह लक्ष्मीचे पूजन करणार आहेत, तर दुकाने आणि कार्यालयांमध्ये पूजन होणार असून, शहर-उपनगरांतील दुकाने, कार्यालयेही आकर्षकरीत्या सजविण्यात आली आहेत.

Lakshmi Pujan
Maharashtra Sugarcane Crushing Season: राज्यात १३८ साखर कारखान्यांची धुराडी पेटली; १.३२ कोटी टन ऊस गाळप, १०.८७ लाख टन साखर उत्पादन

दुकानांमध्ये व्यापारी लक्ष्मीपूजनासोबतच प्रथेप्रमाणे चोपड्या-वह्या, खातेपुस्तिका आणि दुकानाची पूजा करणार आहेत. नव्या कपड्यांमध्ये अन् उत्साहात लहान मुले विविध प्रकारच्या फटाक्यांची आतषबाजी करणार असून, सहकुटुंब एकत्र येऊन दिव्या-पणत्यांच्या लख्ख प्रकाशात दिवाळी साजरी करण्यात येणार आहे. एकत्रितपणे फराळाचा आस्वादही घेण्यात येणार आहे. दिवाळीच्या सणानिमित्त मंदिरेही विद्युत रोषणाईने उजळली आहेत. मंदिरांमध्येही विविध धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. प्रत्येकजण हा आनंदोत्सव जल्लोषात साजरा करणार आहेत.

Lakshmi Pujan
Maharashtra Professional Education Admission Rules: व्यावसायिक शिक्षणाच्या प्रवेश आणि शुल्क नियमांत बदल होणार? राज्य सरकारकडून सातसदस्यीय समिती गठित

लक्ष्मी-कुबेर पूजन

शेतकऱ्यांसाठी जशी मार्गशीर्षातील वेळा अमावास्या शुभ आहे, त्याप्रमाणे व्यापारी वर्गासाठी आश्विनातील अमावास्या शुभ आहे. पुराणातील कथेप्रमाणे आश्विन अमावास्येस रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करीत असते. जेथे स्वच्छता, शोभा, आनंद आहे अशा ठिकाणी ती आकर्षित होते. म्हणून लक्ष्मीपूजनाचे दिवशी घर, दुकान झाडून, स्वच्छ करून, सुशोभित करून सूर्यास्तानंतर लक्ष्मी आणि कुबेर यांचे पूजन करून ऐश्वर्य, संपत्ती, समृद्धिसाठी प्रार्थना करावयाची असते. यापूजेत समृद्धीचे प्रतीक म्हणून साळीच्या लाह्या आवश्यक असतात.

Lakshmi Pujan
Pune Construction Site Safety: दिवाळीत पुण्यातील बांधकामांवर महापालिकेचा सुरक्षा वॉच; नियम मोडणारी कामे तातडीने बंद होणार!

नरक चतुर्दशी

नरक चतुर्दशीला पहाटे अभ्यंगस्नान करणे महत्त्वाचे मानले आहे. शरद् ऋतूचा शेवट आणि हेमंत ऋतूचे आगमन अशा संधीकालावर दिवाळीचा सण साजरा करताना पुढे येणाऱ्या थंडीच्या काळासाठी तेल लावून स्नान करण्याची सुरुवात नरक चतुर्दशीच्या अभ्यंगस्नानापासून होते. नरक चतुर्दशीचे दिवशी यमतर्पण करावयास सांगितले आहे. अपघात, धावपळीचे जीवन आदी अनेक कारणांमुळे अपमृत्यूचा संभव वाढत असल्याने नरकचतुर्दशीला यमतर्पण करून अपमृत्यू निवारणासाठी यमाची प्रार्थना सर्वांनी करणे आवश्यक आहे, अशी माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.