Malshiras ZP Election
Malshiras ZP ElectionPudhari

Malshiras ZP Election: माळशिरस गणात सर्वसामान्य युवकांना संधी

भांडवलदार नव्हे, शेतकरी कुटुंबातील उमेदवारांमध्ये चौरंगी लढत
Published on

नायगाव: पैसेवाले आणि मोठी गावे, असे समीकरण सध्या उमेदवारी देताना सर्वत्र पाहावयास मिळत आहे. माळशिरस गण मात्र याला अपवाद असून, सर्वसामान्य कुटुंबातील होतकरू युवकांना राजकीय पक्षांनी उमेदवारी दिल्याचे दिसत आहे.

Malshiras ZP Election
Patas ZP PS Election: पाटस जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणूक थेट लढतीकडे

पुरंदर तालुक्यात सध्या राजकीय आखाडे सुरू झाले आहेत. सर्वच राजकीय पक्षांत इच्छुकांची मांदियाळी असल्याने कोणाला तिकीट द्यावे, असा प्रश्न सर्व राजकीय पक्षांना पडला होता. अनेक ठिकाणी निवडणुकीत ज्या उमेदवाराकडे पैसे खर्च करण्याची ताकद आणि त्याचे गाव मतदानसंख्येने मोठे आहे का? हे पाहून तिकिटे दिली गेली. माळशिरस गणात मात्र सर्वसामान्य कुटुंबातील युवकांना सर्वच पक्षांनी विचारपूर्वक तिकिटे दिल्याचे दिसत आहे.

Malshiras ZP Election
Paud Ambadvet ZP Election: पौड-अंबडवेट जिल्हा परिषद गटात चुरशीची लढत

भारतीय जनता पक्षाने माळशिरस गावचे माजी उपसरपंच शेतकरी कुटुंबातील युवक माऊली यादव यांना उमेदवारी दिली आहे. याचबरोबर शिवसेना पक्षाने शेतकऱ्याचा मुलगा माळशिरस ग््राामपंचायतीचे विद्यमान सदस्य शरद यादव यांना उमेदवारी दिली. एकट्या माळशिरस गावात दोन उमेदवारी दिल्याने मतविभाजनाचा फायदा होईल, यादृष्टीने राष्ट्रवादी काँग््रेासने माळशिरस गावाला लागून असलेल्या नायगाव येथील अजिंक्य कड यांना उमेदवारी देऊन शह दिल्याचे बोलले जात आहे.

Malshiras ZP Election
Shirur NCP Politics: अजितदादांनंतर शिरूरच्या राष्ट्रवादीत नेतृत्वाची पोकळी

याचबरोबर काँग््रेास पक्षाने ऐनवेळी पूर्वाश्रमीचे भाजपचे कार्यकर्ते धालेवाडी येथील राजकीय धुरंधर म्हणून ओळखले जाणारे बाळासाहेब काळाणे यांना उमेदवारी दिली. सर्वच उमेदवार हे शेतकरी कुटुंबातील आहेत. माळशिरस गणात शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग््रेास या चार पक्षांनी आपले उमेदवार उभे केले आहेत.

Malshiras ZP Election
Ajit Pawar Memorial Baramati: अजित पवारांच्या अंत्यस्थळी शरद पवार यांची भावूक भेट

या चौरंगी लढतीकडे सर्व मतदारांचे लक्ष वेधले गेले आहे. कारण, सर्वसामान्य कुटुंबांतील हे सर्व उमेदवार असून, सामान्य नागरिकांच्या अडीअडचणी व त्या सोडविण्याची क्षमता या उमेदवारांमध्ये आहे. मतदारराजा यामधून कोणाला संधी देतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुरंदर उपसा आणि जनाई-शिरसाई जलसिंचन योजना चांगल्या पद्धतीने चालविणे आणि या गणात प्रस्तावित असलेले लॉजिस्टिक पार्क आणि बुलेट ट्रेनसारख्या प्रकल्पांना शेतकरी हितासाठी विरोध करणे आदी मुद्दे या गणातील निवडणूक गाजवणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news