Marriage Fraud: विवाहाच्या आमिषाने फसवणूक; नागपूरमधील तरुणीला बिबवेवाडी पोलिसांची अटक

ज्येष्ठ नागरिकाकडून अकरा लाखांहून अधिक रक्कम उकळली; पोलिसांनी रक्कम आणि मोबाईल संच जप्त केले
विवाहाच्या आमिषाने फसवणूक
विवाहाच्या आमिषाने फसवणूकPudhari
Published on
Updated on

पुणे: विवाहाच्या आमिषाने बिबवेवाडी भागातील एका ज्येष्ठ नागरिकाची साडेअकरा लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या नागपूरमधील एका तरुणीला पोलिसांनी अटक केली. तिने फसवणूक केलेली रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. (Latest Pune News)

विवाहाच्या आमिषाने फसवणूक
Firecracker Dispute: फटाके उडविताना वाद : हाणामारीत जखमी तरुणाचा मृत्यू

हर्षला राकेश डेंगळे (वय 28, रा. न्यू ओमनगर, हुडकेश्वर रोड, नागपूर) असे अटक केलेल्या तरुणीचे नाव आहे. याबाबत ज्येष्ठ नागरिकाने बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. फिर्यादींनी एका वृत्तपत्रात विवाहविषयक जाहिरात वाचली होती. या जाहिरातीतील संपर्क क्रमांकावर त्यांनी 18 एप्रिल 2025 रोजी संपर्क साधला. त्यानंतर ममता जोशी असे नाव आरोपी हर्षला डेंगळेने त्यांना सांगितले. त्यानंतर तिने ज्येष्ठ नागरिकाला जाळ्यात ओढले. ‌’तेव्हा कोल्हापूरला आले आहे. माझ्या मावसबहिणीचा अपघात झाला असून उपचारासांठी तातडीने पैशांची गरज आहे. पुण्यात परत आल्यानंतर पैसे परत करते‌’, असे डेंगळेने त्यांना सांगितले. त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगून तिने ज्येष्ठ नागरिकाकडून वेळोवेळी अकरा लाख 47 हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने जमा करून घेतले.

विवाहाच्या आमिषाने फसवणूक
Cyber Fraud: शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचा सापळा; 31 लाख हवाली करून मिळाले फक्त 274 रुपये

त्यानंतर डेंगळेने वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर ज्येष्ठ नागरिकाने 1 जून रोजी पोलिसांकडे तक्रार दिली. याप्रकरणी फसवणूक, तसेच माहिती- तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. बिबवेवाडी पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात आला. तांत्रिक तपासात आरोपी हर्षला डेंगळेने फसवणूक केल्याचे उघडकीस आले.

विवाहाच्या आमिषाने फसवणूक
NCP Candidate Selection: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच

ती नागपूरमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तिला ताब्यात घेतले. तिच्याकडून तीन मोबाइल संच, तसेच 11 लाख 45 हजार रुपये जप्त करण्यात आले. अटक केल्यानंतर तिला शिवाजीनगर न्यायालयात हजर करून तिच्याविरुद्ध अराोपपत्र दाखल करण्यात आले. न्यायालयाने तिला जामीन मंजूर केला आहे.

विवाहाच्या आमिषाने फसवणूक
Leopard Captured Shirur | पिंपरखेड येथे एकाच रात्री वेगवेगळ्या ठिकाणी ३ बिबटे जेरबंद; वनविभागाकडून ७ ठिकाणी पिंजरे

पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली बिबवेवाडी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक अश्विनी सातपुते, गुन्हे शाखेचे निरीक्षक सूरज बेंद्रे, पोलिस कर्मचारी संतोष जाधव, विशाल जाधव, मेधा गायकवाड, प्रतिक करंजे यांनी ही कामगिरी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news