Murder case | धक्कादायक ! डोक्यात दगड घालून तरुणाचा निर्घृण खून

Murder case | धक्कादायक ! डोक्यात दगड घालून तरुणाचा निर्घृण खून

पुणे : पुढारी वृत्तसेवा : बिबवेवाडीत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीतील एका गाळ्यात तरुणाच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याची घटना घडली. त्यानंतर आरोपी स्वतःहून बिबवेवाडी पोलिस ठाण्यात हजर झाल्याची माहिती नागरिकांनी दिली. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेनंतर बिबवेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सायंकाळी नागरिकांनी गर्दी केली. बसवराज चिदानंद गजेंत्रे (वय 25, आंबेडकरनगर, मार्केट यार्ड) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी कवट्या ऊर्फ आतीश शिरसाठ (वय 25, रा. आंबेडकरनगर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

याप्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पोलिसांच्या माहितीनुसार, अप्पर डेपो इंदिरानगर परिसरात बाळासाहेब ओसवाल यांच्या कॉम्प्लेक्सच्या (मार्केट) इमारतीचे बांधकाम काम सुरू आहे. त्या ठिकाणी गाळे काढण्यात आले आहेत. दरम्यान, एका गाळ्यात तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडल्याची माहिती सोमवारी सकाळी उघडकीस आली. ही माहिती मिळताच बाळासाहेब ओसवाल यांनी घटनास्थळी दाखल होत पोलिसांना याची माहिती कळविली. त्यानंतर बिबवेवाडी पोलिसांनी येथे धाव घेतली.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news