पुणे; पुढारी वृत्तसेवा : डेक्कन परिसरातील आपटे रस्ता, घोले रस्ता आणि देशमुख रस्त्यावरील हॉटेल व्यावसायिकांनी साईड आणि रेअर मार्जीनमध्ये केलेल्या अनधिकृत शेड्स महापालिकेच्या बांधकाम विभागाने हटविल्या. या कारवाईत हॉटेल ग्रीन सिग्नलसह तब्बल 13 हॉटेलवर कारवाई करण्यात आली. कार्यकारी अभियंता बिपिन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उप अभियंता सुनील कदम, शाखा अभियंता राहुल रसाळे, कनिष्ठ अभियंता समीर गढई यांच्या पथकाकडील कर्मचार्यांनी ही कारवाई करून तब्बल 9 हजार चौ.फूट क्षेत्र मोकळे केले.
कारवाई करण्यात आलेल्या अन्य हॉटेलमध्ये दुर्गा, जान्हवी, अनुष्का, केदार अमृततुल्य,माधवी स्वीट, बर्गर बाईटचा समावेश आहे.
यापैकी हॉटेल 'ग्रीन सिग्नल'चे अतिक्रमित क्षेत्र जवळपास साडेपाच हजार चौ.फूट होते. या हॉटेलवर यापूर्वी दोन वेळा कारवाई करण्यात आली होती. कारवाईनंतरही पुन्हा बेकायदा शेड उभारल्याचे निदर्शनास आल्यास संबधित आस्थापनेच्या प्रमुखांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा उप अभियंता सुनील कदम यांनी दिला आहे.
हेही वाचा