Waste Management Tender Scam: पालिकेच्या ७ अब्ज रुपयांच्या कचरा निविदेत घोटाळा!

कचरा निविदा ठराविक ठेकेदारासाठीच? अरविंद शिंदेंचा गंभीर आरोप
PMC
PMCPudhari
Published on
Updated on

पुणे: महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने काढलेल्या ५०० मेट्रिक टन प्रतिदिन कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या सुमारे ७ अब्ज रुपयांच्या निविदेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता असून, हा मोठा घोटाळा असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदे यांनी केला आहे.

निविदेतील अटी-शर्ती ठराविक ठेकेदाराला लाभ मिळावा, या उद्देशाने तयार केल्याचा दावा करीत त्यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे तक्रार दाखल केली. आता आयुक्त या प्रकरणात काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागले आहे.

PMC
SRA Scam: रावेतला चाळीच्या जागेवर एसआरएचा घाट; जागा एकच प्रस्ताव मात्र चार वेगवेगळे

या निविदेत ३०० मे. टन ओला आणि २०० मे. टन सुका कचरा एकत्रित प्रक्रिया करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, घनकचरा व्यवस्थापन नियम व केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ओला व सुका कचरा स्वतंत्र प्रकल्पांद्वारे प्रक्रिया करण्याचे निर्देश आहेत. तरीही दोन्ही प्रकारचा कचरा एकाच प्रकल्पात प्रक्रिया करण्याचा आग्रह धरल्याने स्पर्धा मर्यादित होऊन मोजकेच ठेकेदार पात्र ठरतील, असा आरोप केला आहे.

तसेच, या निविदेत जॉइंट व्हेंचर, सहकारी संस्था आणि स्वयंसेवी संस्थांना सहभागी होण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे स्पर्धा रोखून ठराविक कंपन्यांनाच फायदा मिळवून देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शिंदे यांनी केला. शहरात सध्या २५०० टन सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता उपलब्ध असताना नव्या प्रकल्पाची आवश्यकता काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

PMC
Pune Towing Action: सहा महिन्यांनंतर पुन्हा सुरू झाली टोइंग कारवाई; 'नो पार्किंग'मधील वाहनधारकांवर धडक कारवाई

दक्षता विभागाने या निविदेवर १४ आक्षेप नोंदवले होते. मात्र, ते काही तासांतच फेटाळण्यात आल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनीही ओला व सुका कचरा प्रक्रियेसाठी स्वतंत्र निविदा काढण्याचे निर्देश दिल्याचे सांगण्यात आले. नियमांनुसार निविदा प्रक्रिया राबवावी, अन्यथा स्पर्धा आयोगाकडे तक्रार करण्यात येईल, असा इशारा अरविंद शिंदे यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news