Pune Towing Action: सहा महिन्यांनंतर पुन्हा सुरू झाली टोइंग कारवाई; 'नो पार्किंग'मधील वाहनधारकांवर धडक कारवाई

राज्य शासनाने जुन्याच कंत्राटदार कंपनीला तीन महिन्यांची मुदतवाढ दिल्यानंतर वाहतूक शाखेने पुन्हा धडक मोहीम सुरू केली आहे.
Pune Towing Action:
Pune Towing Action:Pudhari
Published on
Updated on

पुणे: शहरातील 'नो पार्किंग'मध्ये बेशिस्तपणे उभी करण्यात येणाऱ्या वाहनांवर तब्बल सहा महिन्यांनंतर पुन्हा एकदा वाहतूक पोलिसांकडून टोइंग कारवाई सुरू झाली आहे. वाहन उचलण्याचे काम करणाऱ्या कंत्राटदार कंपनीचा करार संपुष्टात आल्याने डिसेंबर २०२५ पासून ही कारवाई ठप्प झाली होती.

मात्र, राज्य शासनाने जुन्याच कंत्राटदार कंपनीला तीन महिन्यांची मुदतवाढ दिल्यानंतर वाहतूक शाखेने पुन्हा धडक मोहीम सुरू केली आहे. पुण्यातील वाढती वाहतूक कोंडी आणि रस्त्यांवरील अडथळे दूर करण्यासाठी 'नो पार्किंग'मध्ये उभी असलेली वाहने टोइंग व्हॅनच्या सहाय्याने उचलून नेण्याची कारवाई केली जाते.

Pune Towing Action:
Shirur Child Death Case: लग्नास नकार दिल्याचा संताप; तीन वर्षांच्या निष्पाप चिमुकल्याचा घेतला जीव

मात्र, नवीन निविदा प्रक्रिया रखडल्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून ही कारवाई बंद होती. याच काळात शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठा, व्यापारी संकुले आणि गर्दीच्या रस्त्यांवर नियमबाह्य पार्किंगचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत होत्या.

Pune Towing Action:
Daund Gender Test Case: गर्भलिंग निदान,गर्भपात प्रकरणात गिरीच्या ‘सोनेरी लंकेला’ आश्रय कोणाचा? कोट्यवधींच्या मालमत्ता

टोइंग कारवाई नसल्याने अनेक वाहनचालकांनी 'नो पार्किंग' क्षेत्रात सर्रास वाहने उभी करण्यास सुरुवात केली होती. परिणामी वाहतुकीचा वेग मंदावणे, कोंडी वाढणे आणि आपत्कालीन वाहनांच्या हालचालींना अडथळे निर्माण होण्याचे प्रकार वाढले होते. दरम्यान, वाहतूक पोलिसांनी पुन्हा एकदा टोइंग कारवाई सुरू केली आहे. यामुळे शहरातील वाहतूक शिस्त मिळेल, असे बोलले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news