सोनोग्राफी केल्यानंतर त्याचे अहवाल दर महिन्याच्या पाच तारखेपर्यंत देणे बंधनकारक आहे. त्यात चालढकल केल्याचे निदर्शनास आले आहे. 'ए' फॉर्मवर स्वाक्षरी नाही, डॉक्टरांची स्वाक्षरी नाही, अशा तीन केंद्रांना तीन दिवस बंद ठेवण्याची शिक्षा दिली. तर हीच गोष्ट जास्त रुग्णांबाबत आणि अर्जांबाबत केल्यामुळे तीन सेंटर्सना आठ दिवस बंद ठेवण्यात आले. यापुढेही केंद्र चालकांवर लक्ष ठेवले जाईल,' असे महापालिकेतील सहायक आरोग्य प्रमुख डॉ. कल्पना बळीवंत यांनी सांगितले.