समर्पित आयोग ओबीसी आरक्षणाबाबत नागरिकांचे म्हणणे ऐकणार | पुढारी

समर्पित आयोग ओबीसी आरक्षणाबाबत नागरिकांचे म्हणणे ऐकणार

पुणे : पुढारी वृत्तसेवा

नागरिकांच्या मागास प्रवर्गास आरक्षण देण्यासंदर्भात नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी समर्पित आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे. आयोग शनिवारी (दि.21) पुण्याला भेट देणार असून, जिल्ह्यातील नागरिकांना आयोगाच्या भेटीच्या वेळी मते मांडता येणार आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालय आणि विभागीय आयुक्त कार्यालयात यासाठी नोंदणी करता येणार असून, नागरिकांना नोंदणी करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर परिषद प्रशासन शाखेत कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

पुण्यात संभाव्य पुराची धोक्याची 23 ठिकाणे निश्चित: दहा ठिकाणी स्थलांतराची शक्यता, तुमचा भागही येतोय का पुरपट्ट्यात?

राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती आणि शहरातील महानगरपालिका, नगरपालिका आणि नगर पंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी, व्हीजे एनटींना आरक्षण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्र शासनाने समर्पित आयोग गठित केला आहे.

नाव नोंदणी करा शुक्रवारपर्यंत

विभागीय आयुक्त कार्यालयात शनिवारी सकाळी 9.30 ते 11.30 या वेळेत आयोग भेट देणार आहे. या वेळेत नागरिकांना आपली मते आयोगापुढे मांडता येतील. नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील कक्षात शुक्रवारी (दि. 20) सायंकाळी 6 वाजेपर्यंत नावाची नोंदणी करावी.

खास चोरीसाठी औरंगाबादवरुन यायचा; उच्च शिक्षित तरूणाच्या युट्युब पाहून पुण्यात घरफोड्या

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या dedicatedcommissiononobc@gmail.com किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्याdpopune01@gmail.com या ई-मेलवरदेखील नोंदणी करता येईल, असे नगरपालिका प्रशासनाचे उपायुक्त दत्तात्रय लाघी आणि जिल्हा प्रशासन अधिकारी चंद्रकांत खोसे यांनी सांगितले.

हे ही वाचा : 

Kane Williamson : विल्यमसनने ‘हैदराबाद’ला दिला धक्का! संघाची साथ सोडत न्यूझीलंड गाठले

कर्नाटकातील स्वस्त पेट्रोल-डिझेलमुळे सीमाभागातील पंप मालकांना फटका

काेल्‍हापूर : हेरवाड येथील गायकवाड कुटुंबीयांनी केली विधवा प्रथा बंदी निर्णयाची अंमलबजावणी

 

Back to top button