Pune Municipal Corporation: महापालिका तयार करणार ओल्या कचर्‍यापासून ‘बायो-सीएनजी’

प्रतिदिन 300 टन कचर्‍यावर प्रक्रिया करणार्‍या प्रकल्पाची होणार उभारणी
Pune Municipal Corporation
महापालिका तयार करणार ओल्या कचर्‍यापासून ‘बायो-सीएनजी’Pudhari
Published on
Updated on

पुणे: केंद्र व राज्य शासनाच्या अनुदानातून पुणे महापालिकेच्या वतीने शहरातील ओल्या कचर्‍यावर प्रक्रिया करून बायो-सीएनजी तयार करण्याचा नवा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. दररोज 300 टन कचर्‍यावर प्रक्रिया करण्याची क्षमता असलेल्या या प्रकल्पाची उभारणी शहराबाहेर खासगी ठेकेदारामार्फत केली जाणार आहे.

केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत अभियान (शहरी) 2.0’ आणि राज्याच्या ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियान’अंतर्गत सर्व शहरांना कचरामुक्त करण्याचे उद्दिष्ट असून, घनकचर्‍याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन, शाश्वत स्वच्छता व वापरलेल्या पाण्यावर प्रक्रिया याला प्राधान्य दिले जाणार आहे. (Latest Pune News)

Pune Municipal Corporation
Wari 2025: श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याला वरवंडकरांचा निरोप; हरिनामाच्या गजराने सारा गाव गेला दुमदुमून

याच पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या प्रस्तावाला नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय तांत्रिक समितीच्या 17 व्या बैठकीत नुकतीच मान्यता मिळाली आहे. त्यानंतर संबंधित अध्यादेशाला मंजुरी देण्यात आली आहे.

या आधी ओल्या कचर्‍यापासून कंपोस्ट तयार करण्यासाठी दररोज 675 टन क्षमतेच्या प्रकल्पासाठी 72 कोटी 62 लाख 50 हजार रुपये व लँडफिलिंगसाठी सात कोटी 86 लाख 67 हजार रुपये मंजूर करण्यात आले होते. मात्र, कंपोस्ट प्रकल्प रद्द करून त्यातील निधी बायो-सीएनजी प्रकल्पासाठी वापरला जाणार आहे.

Pune Municipal Corporation
Municipal Elections: प्रभाग रचनेतील हस्तक्षेपावर राष्ट्रवादी शरद पवार गट व ‘आप’चा विरोध

असा असेल प्रकल्प

300 टन ओल्या कचर्‍यावर प्रक्रिया करून बायो-सीएनजी तयार करण्यासाठी एकूण 82 कोटी 10 लाख 73 हजार 310 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये केंद्र शासनाचा हिस्सा 20 कोटी 52 लाख 68 हजार 328 रुपये, राज्याचा 28 कोटी 73 लाख 75 हजार 658 रुपये, तर महापालिकेचा 32 कोटी 84 लाख 29 हजार 324 रुपये असणार आहे.

या प्रकल्पासाठी मोठ्या जागेची आवश्यकता असून, त्यासोबतच ‘बफर झोन’ असणे गरजेचे आहे. प्रकल्पापासून निवासी मिळकती किमान 200 मीटर अंतरावर असाव्यात, त्यामुळे शहराच्या हद्दीत योग्य जागा नसल्यामुळे प्रकल्प शहराबाहेर उभारण्यात येणार असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

ओल्या कचर्‍यावर प्रक्रिया करून बायो-सीएनजी तयार करण्याच्या प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून दररोज 300 टन कचर्‍याची विल्हेवाट लावून त्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. प्रकल्पासाठी जागा खासगी ठेकेदारच उपलब्ध करून देणार आहेत. सध्या दोन ठेकेदारांनी या प्रकल्प उभारणीस स्वारस्य दाखवले आहे. लवकरच स्वारस्य अभिव्यक्तीसाठी प्रस्ताव मागवले जाणार आहेत.

- संदीप कदम, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन, पुणे महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news