Mundhwa land scam | मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरण, शितल तेजवाणीला हायकोर्टाकडून जामीन मंजूर

Mundhwa land scam | अटक प्रक्रिया प्रकरणी पोलिसांचा हलगर्जीपणावर उच्‍च न्‍यायालयाने ओढले ताशेरे
Mundhwa land scam
पुण्यातील बहुचर्चित मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य आरोपी शितल तेजवाणी हिला अखेर मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.Pudhari
Published on
Updated on

Mundhwa Land Scam Shital Tejwani Granted Bail

पुणे : पुण्यातील बहुचर्चित मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य आरोपी शितल तेजवाणी हिला अखेर मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र, हा जामीन मिळण्यामागे पोलिसांचा हलगर्जीपणा कारणीभूत ठरल्याचे समोर आले आहे.

पोलिसांच्या हलगर्जीपणाचा फायदा

शितल तेजवाणीला जामीन मिळण्यामागे बावधन पोलिसांची मोठी कायदेशीर चूक कारणीभूत ठरली आहे. अटकेची प्रक्रिया राबवताना पोलिसांनी नियमांचे उल्लंघन केले, असे ताशेरे उच्‍च न्यायालयाने ओढले आहेत.

Mundhwa land scam
Pune Mundhwa Land Scam: मुंढवा सरकारी जमीन विक्री प्रकरण: सूर्यकांत येवले व रवींद्र तारू यांची विभागीय चौकशी सुरू

पोलिसांनी अटकेचे ठोस कारण दिले नाही

मुंढवा जमीन प्रकरणी ताबा घेताना पोलिसांनी आरोपीला अटकेचे ठोस कारण दिले नाही.: पिंपरीतील सेवा विकास बँक गैरव्यवहार प्रकरणी ताबा घेण्यापूर्वी किमान दोन तास आधी कळवणे बंधनकारक होते, परंतु पोलिसांनी या नियमाची पूर्तता केली नाही. अटकेपूर्वीची आवश्यक कायदेशीर पूर्तता करताना पोलिसांनी कुचराई केल्याचे उच्च न्यायालयाने नमूद केले आणि पोलिसांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Mundhwa land scam
Pune Amedeya Company Stamp Duty Penalty: मुंढवा जमीन प्रकरण: अमेडिया कंपनीला 23 कोटींची मुद्रांक शुल्क व दंडाची नोटीस

पार्थ पवारांच्या नावामुळे प्रकरण आले होते चर्चेत

मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरण हे केवळ आर्थिक गुन्ह्यापुरते मर्यादित राहिले नव्हते. या प्रकरणात राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावरही आरोप झाले होते. राजकीय कनेक्शन आणि मोठ्या रक्कमेचा व्यवहार यामुळे हे प्रकरण संपूर्ण राज्यात गाजले होते.

Mundhwa land scam
Pune Municipal Election Analysis: मुंढवा–कोरेगाव पार्क प्रभाग 14 मध्ये भाजपचे वर्चस्व; तीन जागांवर विजय

तांत्रिक मुद्द्यांवर जामीन मंजूर

शितल तेजवाणीवर सेवा विकास बँक घोटाळा आणि जमिनीच्या इतर व्यवहारांत गैरप्रकार केल्याचे आरोप आहेत. अटकेनंतर पोलिसांनी तिच्याविरुद्ध न्यायालयात विविध पुरावे सादर केले होते. गेल्या अनेक दिवसांपासून ती कारागृहात होती. मात्र, आता तांत्रिक मुद्द्यांवर न्यायालयाने तिला दिलासा दिल्याने पोलिसांच्या तपासावर आणि कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news