

पुणे: मुंढव्यात बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश मुंढवा पोलिसांनी करीत तीन विदेशी महिलांची सुटका केली. या वेळी त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या युगांडा देशाच्या महिलेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
सराह फिओना नागोबी (वय 27, मायुगे, युगांडा) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. मुंढव्यातील दळवी हाइट्स येथील चौथ्या मजल्यावर एका सदनिकेत ही कारवाई करण्यात आली.
मुंढव्यात दळवी हाइट्समधील चौथ्या मजल्यावर हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला असताना युगांडा देशाच्या तीन महिलांकडून वेश्याव्यावसाय करून घेत असल्याचा प्रकार या वेळी उघडकीस आला.
याप्रकरणी त्या तीन महिलांची सुटका करून एका महिलेला बेड्या ठोकण्यात आल्याची माहिती मुंढवा पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्मिता वासनिक यांनी दिली.
दरम्यान, आरोपीचे व पीडित महिलेचे पासपोर्ट पुढील तपासणीसाठी एफआरओ विभागाकडे पाठविण्यात आले आहेत. या महिला टुरिस्ट व्हिसावर भारतात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.