

श्रीकांत बिरवाडकर
म्हसळा : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत म्हसळा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत घड्याळाचा दणदणीत गजर केला आहे. जिल्हा परिषदेच्या दोन आणि पंचायत समितीच्या चारही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत विरोधकांना जोरदार धक्का दिला आहे.
पाभरे जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिल रामचंद्र बसवत यांनी एकूण ५,९९३ मते मिळवत शेकापचे संतोष पाटील (२,८८४ मते) व शिवसेना शिंदे गटाचे अकमल कादरी (२,६४८ मते) यांचा पराभव केला. अनिल बसवत यांनी तब्बल ३,१०९ मताधिक्याने विजय मिळवला.
पांगलोळी जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिषेक भास्कर विचारे यांनी ६,३२२ मते घेत शिवसेना शिंदे गटाचे प्रसाद बोर्ले (२,५६७ मते) व उबाठाचे रोशन पारावे (१,४४८ मते) यांना मागे टाकत ३,७५५ मताधिक्याने दणदणीत विजय संपादन केला.
पंचायत समिती निवडणुकांमध्येही राष्ट्रवादी काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली आहे. पाभरे पंचायत समिती गणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या समृध्दी संदीप चाचले यांनी ३,०७८ मते मिळवत शेकापच्या ज्योती गीजे (१,४४३) व शिवसेना शिंदे गटाच्या अमिता जाधव (१,२५८) यांचा पराभव करत १,६३५ मताधिक्याने विजय मिळवला.
खरसई पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे लहू अंबाजी म्हात्रे यांनी २,७७८ मते घेत शिवसेना शिंदे गटाचे महेश पाटील (१,६६८) व उबाठाचे रमेश खोत (१,२२०) यांचा पराभव करत १,११० मताधिक्याने विजय मिळवला.
साळविंडे पंचायत समिती गणात राष्ट्रवादी काँग्रेसचे बबन श्रीपत मनवे यांनी ३,४१३ मते मिळवत शिवसेना शिंदे गटाचे अमोल पेंढारी (१,५९२) व उबाठाचे बाळकृष्ण म्हात्रे (७०७) यांचा पराभव करत १,८२१ मताधिक्याने विजय संपादन केला.पांगलोळी पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रियंका प्रसन्न निंबरे यांनी ३,१३१ मते मिळवत शिवसेना शिंदे गटाच्या रिया पाटेकर (९४९) व उबाठाचे चैतन्या गजमल (७३१) यांचा पराभव करत २,१८२ मताधिक्याने विजय मिळवला. या निकालांमुळे म्हसळा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण आहे. विजय मिळाल्यानंतर ठिकठिकाणी जल्लोष करत घड्याळाच्या गजरात कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला.